मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

साम्राज्यांचा उदय आणि अस्त: इब्न खल्दून यांची 'साम्राज्य चक्र' संकल्पना

2 मिनिट वाचन

समाजशास्त्राचे जनक मानले जाणाऱ्या इब्न खल्दून यांनी मांडलेली साम्राज्यांच्या विनाशाची पाच टप्प्यांची संकल्पना आजही कशी लागू पडते?

शेअर करा:
साम्राज्यांचा उदय आणि अस्त: इब्न खल्दून यांची 'साम्राज्य चक्र' संकल्पना

इब्न खल्दून हा १४व्या शतकातील उत्तर आफ्रिकेतला एक महान विद्वान विचारवंत होता होते. इब्न खल्दून यांना समाजशास्त्र (Sociology), इतिहासलेखन (Historiography) आणि अर्थशास्त्र (Economics) यांचे प्रारंभीचे जनक मानले जाते.“साम्राज्य चक्र” (Empire Cycle) या संकल्पनेचा जनक असेही त्याना म्हटले जाते. काय आहे ही साम्राज्य चक्राची संकल्पना ते आता बघूया.

सर्व मोठी साम्राज्ये अखेर कोसळतातच . कोणत्याही काळातील प्रभुत्वशाली शक्तीला भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि दूरदृष्टीचा अभाव यांमुळे झटका बसतो. एखादा देश त्याला मजबूत बनवणाऱ्या गोष्टी विसरतो, आणि आत्मसंतुष्टता कमकुवतपणा निर्माण करते. जेव्हा एखादे राष्ट्र फक्त वरच्या थोड्या लोकांच्याच हिताकडे लक्ष देऊ लागते, तेव्हा लवकरच कुणीतरी किंवा काहीतरी त्याची सत्ता हस्तगत करते.यालाच “साम्राज्य चक्र” (Empire Cycle) म्हणतात इब्न खल्दून यांच्या मते, कोणत्याही साम्राज्याची किंवा राष्ट्राची ताकद त्याच्या “असाबिया” म्हणजेच सामाजिक एकात्मतेवर अवलंबून असते. ही म्हणजे एखाद्या जमाती, राष्ट्र किंवा लोकांमधील एकजूट आणि परस्पर बंध.

असाबिया कठीण परिस्थितीत आणि संघर्षाच्या काळात सर्वाधिक मजबूत असते; परंतु जेव्हा समाज सुखसोयींमध्ये आणि ऐषआरामात स्थिरावतो, तेव्हा ती हळूहळू कमकुवत होते. इब्न खल्दून यांच्या मते, एखादे साम्राज्य साधारणपणे पाच पिढ्यांमध्ये उभे राहते आणि कोसळते:

पहिली पिढी – एकजूट असलेल्या लोकांची प्रचंड जिंकण्याची मोहीम आणि आत्मविश्वास.

दुसरी पिढी – सामुदायिक नेतृत्वापासून केंद्रीकृत सत्तेकडे वाटचाल.

तिसरी पिढी – शहाण्या आणि समृद्ध शासकाच्या काळातील सुवर्णयुग.

चौथी पिढी – अति आत्मविश्वास, अहंकार, भ्रष्टाचार आणि स्वार्थ यांची हळूहळू वाढ.

पाचवी पिढी – पराभव आणि नव्या, अधिक एकजूट असलेल्या गटाकडून सत्तेचा ताबा.

इब्न खल्दून यांचा इतिहासाकडे पाहण्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोन आज व्यापकपणे मान्य आहे. त्यांचे “साम्राज्य चक्र” हे सर्व काळातील राजवंश आणि सरकारांवर लागू पडते—जसे ते १४व्या शतकातील खलिफासाठी लागू होते, तसेच आजच्या काळातही तितकेच सुसंगत आहे.

तुमचे निरीक्षण आणि मत जरूर मांडा

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!
लाइफस्टाइल

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!

माचीसच्या मक्तेदारीच्या जोरावर युरोपमधील सरकारांनाच कर्जाच्या जाळ्यात ओढणाऱ्या स्वीडिश उद्योगपती इव्हार क्रुगरची थक्क करणारी कहाणी.

१४ ऑक्टोबर, २०२६

गल्फ वॉरची क्रूरता जगासमोर आणणारे केनेथ जारेके यांचे 'ते' छायाचित्र
लाइफस्टाइल

गल्फ वॉरची क्रूरता जगासमोर आणणारे केनेथ जारेके यांचे 'ते' छायाचित्र

१९९१ च्या गल्फ वॉरमध्ये जळालेल्या इराकी सैनिकाचे छायाचित्र घेणारे केनेथ जारेके आणि त्या एका फोटोने मांडलेले युद्धाचे विदारक वास्तव.

२४ ऑगस्ट, २०२६

अडीच मिनिटांत विमान अपहरणाचा थरार संपवणारा पायलट: उरी बार-लेव्ह
लाइफस्टाइल

अडीच मिनिटांत विमान अपहरणाचा थरार संपवणारा पायलट: उरी बार-लेव्ह

एका धाडसी पायलटच्या प्रसंगावधानामुळे आकाशातच हायजॅकर्सचा डाव उलथवून लावणारी एल अल फ्लाईट २१९ ची थरारक कथा.

१८ ऑगस्ट, २०२६

संन्याशांच्या तलवारीतून जन्मलेल्या पहिल्या क्रांतीची थरारक गाथा: आनंदमठ
लाइफस्टाइल

संन्याशांच्या तलवारीतून जन्मलेल्या पहिल्या क्रांतीची थरारक गाथा: आनंदमठ

१७७० चा संन्यासी उठाव आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या 'आनंदमठ' कादंबरीमागील रक्तरंजित सत्य इतिहास.

१५ ऑगस्ट, २०२६