मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

नऊवारी ते पाचवारी साडी: राजमाता इंदिरादेवींनी घडवलेली फॅशन क्रांती

2 मिनिट वाचन

नऊवारी साडीची जागा पाचवारीने कशी घेतली आणि कूचबिहारच्या राजमाता इंदिरादेवींनी शिफॉन साडीला कशी प्रतिष्ठा मिळवून दिली, याचा रंजक इतिहास.

शेअर करा:
नऊवारी ते पाचवारी साडी: राजमाता इंदिरादेवींनी घडवलेली फॅशन क्रांती

नऊवारी पातळापासून पाचवारी गोल साडी हा प्रवास ही फॅशनच्या दुनियेतली क्रांती आहे यावर आजच्या काळात फारच थोडी माणसं विश्वास ठेवतील.एकेकाळी मुलगी गोल साडी नेसते या कारणासाठी लग्नं मोडली आहेत.गोल साडी म्हणजे पाचवारी साडी.नऊवारी ते पाचवारी हे सामाजिक स्थित्यंतराचे माप झाले.

वाराचे -चाळीस इंचाचे माप-जाऊन पन्नास वर्ष झाली. मोजमाप मीटर-सेंटीमीटरमध्ये सुरू झाले.साडी नव्या मापाने साडेपाच मीटरची झाली.बोलीभाषेत पातळ या शब्दाची जागा साडी या शब्दाने घेतली पण नऊवारीचे माप समाजमनात राहिल्याने साडी अजूनही पाचवारीच राहिली.गोल साडी नेसून-सायकलवरून नोकरीला जाणारी बाई हे सामाजिक स्थित्यंतराचे मोठे वळण होते.

इतर फॅशनची सुरुवात जशी समाजातल्या उच्चभ्रू नगरजनांपासून होते तशीच पाचवारी साडी नेसण्याची पद्धत उच्चभ्रू घरातून झाली.

एखाद्या नव्या पायंडय़ाची सुरुवात दु:खातून कशी होते याचे उदाहरण म्हणजे कूचबिहारच्या राजमाता इंदिरादेवींचे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा त्यांचा प्रेमविवाह कूचबिहारच्या राजपुत्राशी झाला. कूचबिहारच्या घराण्याला अतिमद्यासक्तीचा शाप होता. त्यामुळे इंदिरादेवींच्या पतीचे निधन फार लवकर झाले. वयाच्या तिशीच्या आतच राणीवर राजमाता बनण्याची जबाबदारी येऊन पडली. संस्थानाच्या कारभारासाठी लोकांसमोर येणे भाग होते, पण कपाळी वैधव्य असल्याने राजघराण्यातील भरजरी साडय़ा नेसायची मुभा नव्हती. यावर उपाय म्हणून त्यांनी पाच वारी शिफॉनच्या साडय़ांचा वापर सुरू केला. शिफॉनच्या कपडय़ाला एक प्रकारची ऐट असते. थोडेसे झिरझिरीत असे हे कापड भडक दिसत नाही .त्याचा पोत ज्याला सब्डय़ुड म्हणता येईल असा असतो. त्यावर वापरले जाणारे रंग त्यामुळे झगमगत नाहीत. त्यामुळे भारदस्त अशी छाप पडते. त्यानंतर त्यांच्या सगळ्या साडय़ा पॅरिसहून विणून यायच्या.आयुष्यातल्या एका खिन्न परिवर्तनाला त्यांनी हे असे वेगळे वळण दिले

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

बायकांच्या 'ब्रा'चा रंजक इतिहास: दोन रुमालांपासून सुरू झालेला अब्जावधींचा जागतिक व्यापार!
लाइफस्टाइल

बायकांच्या 'ब्रा'चा रंजक इतिहास: दोन रुमालांपासून सुरू झालेला अब्जावधींचा जागतिक व्यापार!

दोन रेशमी रुमालांपासून सुरू झालेला 'ब्रा'चा प्रवास आणि त्याचा जागतिक फॅशन व व्यापारावर झालेला परिणाम सांगणारा रंजक इतिहास.

३० मे, २०२६

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!
लाइफस्टाइल

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!

माचीसच्या मक्तेदारीच्या जोरावर युरोपमधील सरकारांनाच कर्जाच्या जाळ्यात ओढणाऱ्या स्वीडिश उद्योगपती इव्हार क्रुगरची थक्क करणारी कहाणी.

१४ ऑक्टोबर, २०२६

गल्फ वॉरची क्रूरता जगासमोर आणणारे केनेथ जारेके यांचे 'ते' छायाचित्र
लाइफस्टाइल

गल्फ वॉरची क्रूरता जगासमोर आणणारे केनेथ जारेके यांचे 'ते' छायाचित्र

१९९१ च्या गल्फ वॉरमध्ये जळालेल्या इराकी सैनिकाचे छायाचित्र घेणारे केनेथ जारेके आणि त्या एका फोटोने मांडलेले युद्धाचे विदारक वास्तव.

२४ ऑगस्ट, २०२६

अडीच मिनिटांत विमान अपहरणाचा थरार संपवणारा पायलट: उरी बार-लेव्ह
लाइफस्टाइल

अडीच मिनिटांत विमान अपहरणाचा थरार संपवणारा पायलट: उरी बार-लेव्ह

एका धाडसी पायलटच्या प्रसंगावधानामुळे आकाशातच हायजॅकर्सचा डाव उलथवून लावणारी एल अल फ्लाईट २१९ ची थरारक कथा.

१८ ऑगस्ट, २०२६