खऱ्याखुऱ्या आयुष्यात PUBG?? कोण आणि कुठे आयोजित करत आहे?
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/pubg-830x458-576x356.jpg?itok=fPC-P_o-)
मंडळी, एकीकडे भारतात पब्जीवर बंदी आणण्याचे विचार चालू आहेत तर दुसरीकडे एका कोट्याधीशाने खऱ्याखुऱ्या पब्जीची योजना आखली आहे. त्याल मोबाईल मधला गेम सत्यत उतरवायचा आहे राव. काय आहे ही योजना ? चला जाणून घेऊया.
या कोट्यधीशाचं नाव समजलेलं नाही. HushHush.com या वेबसाईटने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत सांगण्यात आलंय की हा करोडपती एका अशा गेमरच्या शोधात आहे जो त्याला पब्जीला खऱ्या आयुष्यात उतरवण्यास मदत करेल. यासाठी तो तब्बल ४५,००० पाऊंड म्हणजे जवळजवळ ४० लाख रुपये द्यायला तयार आहे.
या कोट्यधीशाचं स्वप्न आहे की ज्या प्रमाणे पब्जी एका बेटावर खेळलं जातं अगदी तसंच त्याचं आयोजन एका बेटावर व्हावं. हा खेळ ३ दिवस आणि दिवसातून १२ तास चालेल. गेमसाठी त्याने तब्बल ९० लाखांपर्यंत जॅकपॉट पण ठेवला आहे.
या खऱ्याखुऱ्या खेळात १०० लोकांची निवड केली जाईल. खेळासाठी लागणाऱ्या खास बंदुका पण दिल्या जातील. याखेरीज बॉडी आर्मर, खाण्यापिण्याचं समान आणि राहण्याची सोय पण केली जाईल. मोबाईलवर जसा हा खेळ रक्तरंजित वाटतो तसा हा खऱ्या आयुष्यात मात्र नसेल राव. हा खेळ सुरक्षेची खात्री करून घेऊन खेळला जाईल.
मंडळी, जर ही योजना यशस्वी झाली तर या कोट्याधीशाला या खेळाची वार्षिक स्पर्धा भरवायची आहे ज्यात दरवर्षी १०० लोकांना हा खेळ खेळता येईल.
तर कोणकोण तयार आहे या खऱ्याखुऱ्या पब्जीसाठी ?? आपल्या पब्जीवेड्या मित्रांना tag नक्की करा !!
आणखी वाचा :