मेलेल्या माणसांना जिवंत करण्याचा नवीन ट्रेंड ? काय आहे #ResurrectionChallenge ??

असं म्हणतात की येशू ख्रिस्त हे मरणाच्या ३ दिवसानंतर पुन्हा जिवंत झाले होते. या गोष्टीवर विश्वास ठेवणं, न ठेवणं हा श्रद्धेचा भाग आहे, पण समजा आजच्या काळात कोणी म्हटलं की ‘मी मेलेल्या माणसाला झटक्यात जिवंत करतो’ तर ? तो खोटं बोलतोय हे नक्की. असाच एक किस्सा सध्या व्हायरल होतोय.

तर, आल्फ लकाऊ नावाच्या साऊथ आफ्रिकन पाद्रीचा एक व्हिडीओ काही दिवसापूर्वी व्हायरल झाला होता. व्हिडीओत तो एका मेलेल्या माणसाला जिवंत करतोय. तो फक्त ‘उठ’ म्हणाला आणि मेलेला माणूस शव पेटीतून जिवंत झाला ना भाऊ. बघणारी पब्लिक अवाक झाली होती.

स्रोत

व्हिडीओ मध्ये एक बाई पण होत्या. त्या म्हणाल्या की तो माणूस त्यांच्या डोळ्यांसमोर मेला होता. म्हणजे काय चमत्कार पाहा.

मंडळी, हा भंपक व्हिडीओ सोशल मिडीयावर हसण्याचा विषय ठरला. लोकांनी व्हिडीओ चांगलाच ट्रोल केलाय. पण या व्हिडीओने एका नव्या चॅलेंजचा जन्म झाला राव. हे चॅलेंज होतं #ResurrectionChallenge. म्हणजे काय ते या व्हिडीओ मध्ये पाहा.

मंडळी लोकांनी आल्फ लकाऊकडून प्रेरणा घेऊन कॉमेडी व्हिडीओ बनवायला घेतले आहेत. साउथ आफ्रिकेत हा नवीन चॅलेंज व्हायरल होतोय. या चॅलेंजचे काही निवडक नमुने पाहून घ्या.

तर मंडळी, हे सगळं ज्याने सुरु केलं त्या ‘आल्फ लकाऊ’ला आपला हा चमत्कार महागात पडलाय. अहो त्याला आता लोक कोर्टात खेचणार आहेत. आता बघू तो काय चमत्कार दाखवतो ते !!

 

आणखी वाचा :

केरळमधील लोक वाहनांपुढे येड्यावानी का नाचत आहेत ? काय आहे हा प्रकार ?

हे किकी चालेंज काय आहे भाऊ ? किकी बद्दल सगळी माहिती फक्त एका क्लिकवर !!

चालत्या रेल्वे समोर केला किकी डान्स...बदल्यात अशी शिक्षा मिळाली की तुम्ही विचारही केला नसेल !!

सबस्क्राईब करा

* indicates required