computer

हे खाद्यपदार्थ चक्क भारतीय नाहीत!!

या जगात एकही असा खाद्यवेडा नसेल जो भारतात आलाय आणि त्याला भारताची खाद्यसंस्कृती आवडली नाही. जगभरात भारतीय पदार्थांचे चाहते पसरले आहेत. पण आपण भारतीय लोक रोज असेही काही पदार्थ खातो जे मूळचे भारतीय नसून ते बाहेरून आपल्या देशात आले आहेत. पहा कोणते पदार्थ आहेत हे... 

१. चहा

तमाम भारतीयांचा जीव की प्राण असलेला हा चहा ब्रिटिशांनी भारतात आणला. मूळचा चीनचा असलेला हा चहा तिकडे एक औषधी पेय म्हणून प्यायला जातो आणि आपल्याकडे अमृत म्हणून! 

२. गुलाबजाम

भारतीयांच्या लग्नसमारंभात हमखास दिसणारा गुलाबजाम्हा मूळचा पर्शियन पदार्थ आहे. जो मुघल काळात भारतात आला. 

३. सामोसा 

सामोसा तर भारतात कुठेही मिळतोच मिळतो. तेराव्या शतकात हा पदार्थ मध्यपूर्वेतून बाहेरच्या व्यापाऱ्यांनी भारतात आणलाय. कदाचित इराण मधून. तिकडे सामोशाला 'संबोसा' असं म्हणतात. 

४. नान

खास करून उत्तर भारतीयांची 'जान' असलेला हा नान सुद्धा मुघल काळात पर्शिया आणि इराण मधूनच भारतात आलाय.

५. जिलेबी

हो, ही पण परदेशीच आहे. जिलेबी हा मूळचा अरब आणि पर्शियन पदार्थ आहे जो पर्शियन आक्रमणकर्त्यांनी भारतात आणला. 

६. राजमा 

 नुसतं राजमा किंवा राजमा-चावल म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं ना? पण हा राजमा आहे मूळ मेक्सिकोमधला. आता तर काही बोलायची सोयच राहिली नाही.

७. साबुदाणे आणि बटाटा

साबुदाणे आणि बटाट्याशिवाय आपला एकही उपवास साजरा होत नाही. यातला साबुदाणा आहे मूळचा पोर्तुगीज आणि बटाटा आहे पेरू बोलिव्हिया भागातला. १६व्या शतकात साबुदाण्याचा जगात प्रसार व्हायला सुरूवात झाली होती तर बटाटा इसवी सन पूर्व ८००० ते ५००० दरम्यान पहिल्यांदा ’पेरू’ मध्ये खाल्ल्या गेल्याचा इतिहास सापडतो.  

८. डाळ-भात

आता हेच बाकी होतं.. याला भारताचा राष्ट्रीय अन्नपदार्थ म्हटलं तरी चुकीचं नाही पण हा पदार्थ पण नेपाळी आहे राव!!


आता उरलंय तरी काय आपलं स्वतःचं ?

सबस्क्राईब करा

* indicates required