computer

आता फक्त १० मिनिटात पॅनकार्ड डाऊनलोड करा...या ५ सोप्प्या स्टेप्स पाहून घ्या !!

पॅनकार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला २ पानांचा फॉर्म भरावा लागतो. मग काही दिवस वाट बघावी लागते. यापुढे असं काहीही करावं लागणार नाही, कारण तुमच्याकडे जर आधारकार्ड असेल तर तुम्हाला अगदी सहज ई-पॅनकार्ड मिळू शकतं. त्यासाठी काय प्रक्रिया असते आणि नियम काय आहेत ते आजच्या लेखात जाणून घेऊया.

मंडळी, आयकर विभागाने पॅनकार्ड मिळवण्यासाठी आता एक नवीन आणि सोप्पा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. तुमच्याकडे आधारकार्ड असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करून पॅनकार्ड डाऊनलोड करू शकता. आणि हो हे अगदी मोफत असणार आहे.

तर, आता प्रक्रिया जाणून घेऊया.

१. या लिंकवर क्लिक करा : https://www.incometaxindiaefiling.gov.in/e-PAN/index.html?lang=eng

२. समोर दोन पर्याय दिसतील. त्यापैकी Get New PAN पर्याय निवडा.

३. आता समोर एक ई-फॉर्म दिसेल. या फॉर्ममध्ये तुमचा आधार क्रमांक आणि Captcha code लिहा.

४. यानंतर तुमच्या आधारकार्डशी जोडलेल्या नंबरवर OTP क्रमांक येईल. OTP क्रमांक लिहिल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल.

५. यापुढे तुम्हाला ईमेल आयडीचा पर्याय दिला जातो. तुम्ही तुमचा ईमेल आयडी पॅनकार्डशी जोडू शकता.

या सगळ्या प्रक्रियेतून गेल्यानंतर तुमचं काम संपतं. यानंतर तुम्ही दिलेली माहिती आधारकार्डच्या Unique Identification Authority of India(UIDAI) संस्थेला पाठवून तपासणी केली जाते. तपासणी पूर्ण झाली आणि हिरवा कंदील मिळाला की तुम्हाला लगेचच ई-पॅनकार्ड पाठवला जातो.

तुम्ही हे ई-पॅनकार्ड PDF रुपात डाऊनलोड करू शकता. डाउनलोड करण्यासाठी https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/ePANStatus.html?lang=eng या लिंकवर क्लिक करा. जर तुम्ही फॉर्म भरताना ईमेल आयडी दिला असेल तर तुम्हाला डाऊनलोडसाठी लिंक मेल केली जाते. तुम्हाला जर वाटत असेल की ई-पॅनकार्ड डाऊनलोड केलं पण गरजेच्यावेळी पॅनकार्डची कॉपी जवळ असणं गरजेचं आहे, तर तुम्ही अगदी ५० रुपयात घरपोच पॅनकार्ड मिळवू शकता.

जाता जाता काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.

ऑनलाईन पॅनकार्ड मिळवण्याची व्यवस्था फक्त नवीन अर्जदारांसाठी उपलब्ध आहे. आधारकार्डची माहिती देताना सध्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला आहे ना आणि आधारकार्डवर असलेली जन्मतारीख बरोबर आहे न  याची खात्री असणं गरजेचं आहे. या मार्गाने अल्पवयीन व्यक्तींना पॅनकार्ड मिळू शकत नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required