computer

जगभरात किती आहे पेट्रोलची किंमत ? आपल्याकडच्या आणि त्यांच्या किमतीत किती फरक आहे जाणून घ्या !!

पेट्रोल आणि डीझेल ज्वालाग्राही आहे हे तर वैज्ञानिक सत्य आहे. त्याहूनही मोठं सत्य हे आहे की पेट्रोल डीझेलचा भाव जास्तच ज्वालाग्राही आहे. साहजिकच आहे की ज्या देशात ७०% हून अधिक क्रूड ऑईल (कच्चे तेल) आयात केले जाते त्या देशाचे राहणीमान कच्चे तेल आणि डॉलरचा बाजार भाव यावरच अवलंबून असते. आपली परिस्थिती अशी आहे जशी ‘आई जेवायला घालेना, बाप भिक मागू देईना’.

ऑगस्ट पासून पेट्रोल आणि डीझेलच्या किमती भडकायला सुरुवात झाल्या. हे सत्र आजवर कायम आहे. हा लेख लिहिताना आलेल्या बातमीनुसार आज पेट्रोल १४ तर डिझेल १५ पैशांनी महागलं आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत ८८.२६ रुपये प्रतिलिटर आहे तर डीझेलची किंमत ७७.४७ रुपये प्रतिलिटर आहे. आपल्या सर्वांनाच पडणारा प्रश्न म्हणजे आपल्या देशात या किमती आहेत तर जगभरातल्या देशांमध्ये किती असतील ?

याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही घेऊन आलो आहोत. चला तर बघूया जगातल्या प्रमुख देशांमध्ये पेट्रोलची किंमत किती आहे !!

(खालील आकडे २०१८ मधील आहेत. सर्व किमती भारतीय चलना प्रमाणे)

व्हेनेझुएला - 0.58

सुदान - 23.24

कुवैत - 23.64

इराण - 24.4 9

अल्जेरिया - 24.59

इजिप्त - 25.07

नायजेरिया - 28.53

सीरिया - 29.73

सौदी अरेबिया - 37.00

कतार - 37.37

मलेशिया - 37.72

ओमान - 39.23

इराक - 42.97

रशिया - 48.98

पाकिस्तान - 51.64

भुतान - 57.02

यूएसए - 57.56

व्हिएतनाम - 63.27

श्रीलंका - 63.77

नेपाळ - 68.74

मेक्सिको - 69.10

बांगलादेश -  71.69

ऑस्ट्रेलिया -  74.29

अर्जेंटिना -  77.60

दक्षिण आफ्रिका  - 79.68

थायलंड -  79.79

ब्राझील 80.10

चीन  - 80.90

कॅनडा  - 81.68

जपान -  89.31

दक्षिण कोरिया  - 100.56

ऑस्ट्रिया -  101.59

स्पेन  - 106.16

न्यूझीलंड  - 110. 9 0

स्वित्झर्लंड -  110.98

सिंगापूर  - 111.62

आयर्लंड  - 114.58

जर्मनी -  115.46

यूके -  116.34

पोर्तुगाल - 126.53

इस्राएल - 127.43

इटली - 128.77

ग्रीस - 130.70

डेन्मार्क - 131.9 9

नेदरलँड्स - 133.50

नॉर्वे - 139.85

हाँगकाँग - 144.23

आइसलंड - 144.52

 

मंडळी, काही देशांमध्ये अगदी क्षुल्लक रुपयात पेट्रोल मिळते असं दिसतं, पण हेही समजून घेतलं पाहिजे की तिथे इतर सामान्य वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. प्रत्येक देशाला आपापल्या समस्या आहेत. आपल्या देशातली आजची समस्या आहे 'पेट्रोल' आणि 'डीझेल'...

सबस्क्राईब करा

* indicates required