व्हिडीओ ऑफ दि डे : PSLV उड्डाणाचा याहून चांगला व्हिडीओ तुम्ही नक्कीच बघितला नसणार.....

एप्रिलच्या पहिल्याच तारखेस इस्रोने आपली नवीन मोहीम फत्ते केली. भारताचा एक आणि परदेशी तब्बल २८ उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. हा महत्वाचा क्षण आपण सगळ्यांनीच पाहिला असेल, पण खऱ्या अर्थाने तो अनुभवला तो एका पायलटने. हे पायलट महाशय भलतेच 'लकी' निघालेत भाऊ.... हा पाहा व्हिडीओ.

कॅप्टन ‘करुण करुम्बाया’ हे इंडिगो एरलाईन्सचे पायलट आहेत. PSLV C-45च्या प्रक्षेपणाच्या वेळी ते विमानात होते. त्यांनी विमानाच्या कॉकपिट मधून या ऐतिहासिक क्षणाला कॅमेऱ्यात कैद केलं आहे. विमानातील इतर प्रवाशांना हा क्षण अनुभवता यावा म्हणून त्यांनी घोषणाच केली होती. “आपल्या उजव्या बाजूला पाहा, खिडकीतून तुम्हाला PSLV लाँच दिसेल.” हा अवघ्या ४४ सेकंदाचा आपल्याला एक वेगळा अनुभव देतो. 

मंडळी, संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्गे सदस्य मनोज कुमार चनान यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यानंतर तो व्हायरल झाला. लोकांनी या व्हिडीओचं भरभरून कौतुक केलं आहे. या पाहा काही मोजक्या प्रतिक्रिया.

मंडळी, हा ऐतिहासिक अनुभव तुम्हाला कसा वाटला ? तुमची प्रतिक्रिया नक्की द्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required