मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

हे येडचाप मीम्स पाहून दिवस वाया नाही, मस्तच जाईल पाहा!!

3 मिनिट वाचन
शेअर करा:
हे येडचाप मीम्स पाहून दिवस वाया नाही, मस्तच जाईल पाहा!!

भारतात जिओने डिजिटल क्रांती केल्यानंतर अनेक भन्नाट डोक्याच्या लोकांनी आपली प्रतिभा दाखवायला सुरुवात केली. मीम पेजेस हा त्यातलाच एक प्रकार. सहसा कुठलीही गोष्ट ही काही काळानंतर बोर व्हायला लागते, पण मिम्सचे तसे नाही मिम्स हा प्रकार उदयास येऊन खूप दिवस झाले तरी मीम फिवर काही कमी होत नाही. त्याचे कारण आहे सातत्याने होत असलेला बदल. हुशार लोक नेहमी नवनवीन ट्रेंड्सवर मीम बनवत असतात. एक ट्रेंड संपत नाही तेवढयात कुणी ना कुणी काही ना काही करतो आणि मिम्स बनायला सुरवात होते. अशा प्रकारे ही नेव्हर एंडिंग सायकल झाली आहे राव!! 

आधी काय व्हायचे की ठराविक लोक फक्त मिम्स बनवायची पण आता मिम्सबद्दल सगळ्यांना आयडीया आली असल्याने सगळेच मिम्स बनवतात. अशातच काही अफलातून डोक्यालिटी असणारे गडी जाम भाव खाऊन जातात.

सध्या असेच एक पेज तुफान धुमाकूळ घालत आहे. इंस्टाग्रामवर असलेल्या या पेजचे मिम्स सगळ्या सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. या पेजचे नाव आहे, 'just here to ruin your day,' म्हणजे आम्ही तुमचा दिवस वाया घालविण्यासाठी येथे आहोत. तुम्ही म्हणाल असे काय स्पेशल असते या पेजवर तर काही नाही राव!! थोडंस डोकं वापरून इकडची गोष्ट तिकडे जोडायची या फोटोशॉप मधुन जो मीम तयार होतो तो निव्वळ कहर असतो. 

कधी कबीर सिंगमधल्या शाहिद कपुरला फिर हेरा फेरी मधील परेश रावल जोडून द्यायचा तर कधी सनी लियोन सोबत सनी देओलचा फ़ोटो जोडून द्यायचा यातून जी केमिस्ट्री तयार होते तीच या पेजची विशेषता आहे आणि त्याचमुळे हे पेज एवढे वायरल झाले आहे. 

खाली या पेजवरील काही मिम्स दिले आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

लेखक : वैभव पाटील

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलमैत्री तुटल्याचा हा मीम चक्क ३८ लाखांना विकला गेलाय...काय आहे या मीममागची गोष्ट??वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

SBI ठरली जगातील सर्वोत्तम बँक, पण सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चा!
लाइफस्टाइल

SBI ठरली जगातील सर्वोत्तम बँक, पण सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चा!

Global Finance या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने SBI ला ‘World’s Best Consumer Bank’ हा बहुमान दिला आहे. पण सोशल मीडियावर मात्र बँकेच्या सेवेवरून भन्नाट विनोद व्हायरल होत आहेत.

२१ ऑक्टोबर, २०२६

मोदी-मेलनींची ती 'मेलडी' आणि दलाल स्ट्रीटवरची 'कॉमेडी'!
लाइफस्टाइल

मोदी-मेलनींची ती 'मेलडी' आणि दलाल स्ट्रीटवरची 'कॉमेडी'!

पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलनी यांच्या 'मेलडी' चर्चेमुळे गुंतवणूकदारांनी चुकून पार्ले इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी केल्याची रंजक गोष्ट.

२१ मे, २०२६