मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

SBI ठरली जगातील सर्वोत्तम बँक, पण सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चा!

3 मिनिट वाचन

Global Finance या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने SBI ला ‘World’s Best Consumer Bank’ हा बहुमान दिला आहे. पण सोशल मीडियावर मात्र बँकेच्या सेवेवरून भन्नाट विनोद व्हायरल होत आहेत.

शेअर करा:
SBI ठरली जगातील सर्वोत्तम बँक, पण सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चा!

जगातील सर्वोत्तम बँकांची यादी दरवर्षी प्रसिद्ध करणाऱ्या Global Finance या आंतरराष्ट्रीय आर्थिक नियतकालिकाने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ला ‘World’s Best Consumer Bank’ — जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक हा बहुमान दिला आहे.

या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे, सर्वोत्तम बँक ठरवताना केवळ तिचा आकार, व्यवसायाची व्याप्ती किंवा आर्थिक उलाढाल विचारात घेतली जात नाही. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवेचा दर्जा, जोखीम व्यवस्थापनाची कार्यक्षमता आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील सर्वोत्तम पद्धती यांनाही महत्त्व दिले जाते.

म्हणजेच, बँक किती मोठी आहे यापेक्षा ती किती विश्वासार्ह आहे, ग्राहकांच्या गरजा किती प्रभावीपणे पूर्ण करते आणि आर्थिक आव्हानांना किती समर्थपणे तोंड देते, यावर तिचे श्रेष्ठत्व ठरते.

भारतीय बँकिंग क्षेत्रासाठी आणि देशातील कोट्यवधी SBI ग्राहकांसाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.

बँकेचे ५२ कोटींहून अधिक ग्राहक आणि देशभरातील विस्तृत शाखा-जाळे यांचा या गौरवामागे महत्त्वाचा वाटा आहे.

पण भारतातल्या सर्वसामान्य ग्राहकाचा अनुभव थोडा वेगळाच आहे.

SBI म्हटलं आठवतो—त्यांचा पवित्र मानला जाणारा लंच ब्रेक,

बॅंकेतल्या कधीही न संपणाऱ्या रांगा,

न विसरता वेळोवेळी "गायब" होणारा सर्व्हर,

आणि कर्मचाऱ्यांचा निवांत स्वभाव.

या सगळ्या अनुभवांमधूनच सोशल मीडियावर असंख्य भन्नाट विनोद, टोमणे आणि मीम्स जन्माला आले आहेत. त्यातले काही मोजके विनोद आज वाचा !

१ ) SBI चा सर्व्हर!

ग्राहक: "साहेब, सकाळपासून सर्व्हर बंद आहे. तो कधी सुरू होणार?"

SBI कर्मचारी: "मित्रा, हा सर्व्हर म्हणजे अगदी देवासारखाच आहे."

ग्राहक: "म्हणजे सर्वव्यापी आणि सर्वशक्तिमान?"

SBI कर्मचारी: "नाही... त्याला व्यवस्थित चालताना कुणीच पाहिलेलं नाही.पण तरीही त्याच्यावर श्रद्धा ठेवावीच लागते!"

२) SBI चे योनो ॲप आणि OTP

वापरकर्ता: सकाळी १०:०० वाजता "Send OTP" वर क्लिक करतो.

दरम्यान त्याच्या आयुष्यात...

लग्न होतं...

मुलं होतात...

ती मोठी होतात...

तो निवृत्तही होतो...

आणि मग...एक दिवस निजधामाला जातो

तेराव्याच्या रात्री ११:३० वाजता, फोन वाजतो...

मोबाईल: "आपला SBI OTP आहे: 4582.

३ ) प्रतीक्षा!

मुलगा : "बाबा, आज मला घरी परतायला खूप उशीर होऊ शकतो."

बाबा : "किती उशीर? दोन-तीन तास?"

मुलगा : "दोन-तीन तास... किंवा दोन-तीन वर्षंसुद्धा लागू शकतात बाबा !

मी SBI च्या शाखेत कागदपत्रं जमा करायला चाललो आहे!"

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

टॅग्स:

संबंधित लेख

नोटा छापल्या पण त्या बनावट नव्हत्या! पोर्तुगालच्या 'त्या' भामट्याची अजब गोष्ट
लाइफस्टाइल

नोटा छापल्या पण त्या बनावट नव्हत्या! पोर्तुगालच्या 'त्या' भामट्याची अजब गोष्ट

पोर्तुगालच्या मध्यवर्ती बँकेची खोटी कागदपत्रे बनवून सरकारी प्रेसमधून खऱ्याखुऱ्या नोटा छापणाऱ्या आर्टुर रेईसची अजब कथा.

४ जुलै, २०२६

आधुनिक स्त्रीला बहुतेक सगळे ब्रँड्स अजूनही 'शेजारची काकू' का समजतात?
लाइफस्टाइल

आधुनिक स्त्रीला बहुतेक सगळे ब्रँड्स अजूनही 'शेजारची काकू' का समजतात?

८० टक्के खरेदीचे निर्णय स्त्रिया घेत असतानाही जाहिरातदार आणि ब्रँड्स अजूनही स्त्रियांना दुय्यम ग्राहक का समजतात, यावर परखड भाष्य.

२ जुलै, २०२६

गंजलेल्या तलवारीच्या वजनाइतके सोने: एका वृद्ध स्त्रीच्या चातुर्याची गोष्ट
लाइफस्टाइल

गंजलेल्या तलवारीच्या वजनाइतके सोने: एका वृद्ध स्त्रीच्या चातुर्याची गोष्ट

बोलण्याने हत्ती मिळवता येतो आणि बोलण्यानेच हत्ती गमावताही येतो. अवधच्या नवाबांच्या काळातली, बोलण्याच्या कलेची ताकद सांगणारी एक सुरेख गोष्ट.

२ नोव्हेंबर, २०२६

खऱ्या छापखान्यात छापल्या 'बनावट' नोटा: पोर्तुगालला हादरवणारा घोटाळा
लाइफस्टाइल

खऱ्या छापखान्यात छापल्या 'बनावट' नोटा: पोर्तुगालला हादरवणारा घोटाळा

नोट खऱ्या सरकारी छापखान्यात, खऱ्या साच्यावर छापलेली असेल, तर ती बनावट कशी ठरणार? जवळपास शंभर वर्षांपूर्वी पोर्तुगालमध्ये एका महाभामट्याने हाच प्रश्न प्रत्यक्षात उतरवला.

२ नोव्हेंबर, २०२६

सोन्याच्या खाणी, तरीही गरीब: बुर्कीना फासो देशाची कहाणी
लाइफस्टाइल

सोन्याच्या खाणी, तरीही गरीब: बुर्कीना फासो देशाची कहाणी

या देशाचे उत्पन्न दोन प्रकारच्या सोन्यावर अवलंबून आहे: खाणीतले सोने आणि कापूस. तरीही ५०% हून अधिक जनता दारिद्र्य रेषेखाली जगते आहे.

३० ऑक्टोबर, २०२६

३८ जणांची हत्या करून मांस खाल्ल्याचा आरोप: युगांडातील भयावह प्रकरण
लाइफस्टाइल

३८ जणांची हत्या करून मांस खाल्ल्याचा आरोप: युगांडातील भयावह प्रकरण

माणूस माणसाला खातो? युगांडात मुजुरिझी मोझेस नावाच्या व्यक्तीवर पंधरा वर्षांत ३८ जणांची हत्या करून त्यांचे मांस खाल्ल्याचा आरोप आहे. हे आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.

३० ऑक्टोबर, २०२६