मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

ॲरिस्टॉटल आणि फिलीस: एका मध्ययुगीन झारीमागील रंजक आख्यायिका

2 मिनिट वाचन

मध्ययुगीन काळात हात धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'अ‍ॅक्वामॅनिल' झारीची आणि त्यावर कोरलेल्या ॲरिस्टॉटल-फिलीसच्या कथेची गोष्ट.

शेअर करा:
ॲरिस्टॉटल आणि फिलीस: एका मध्ययुगीन झारीमागील रंजक आख्यायिका

हा काय प्रकार आहे? याला म्हणतात Aquamanile म्हणजे हात धुण्यासाठी वापरलेली पाण्याची झारी ! साधारण चौदाव्या -पंधराव्या शतकात अशा प्रकारच्या झाऱ्या वापरल्या जायच्या.पण आता इतकं सांगून थांबण्यात अर्थ नाही कारण 'पुरुषावर स्वार झालेली बाई' हा विषयच असा गंमतीचा आहे की त्यामागे काहीतरी 'स्टोरी' असणारच आणि ती तुम्हाला सांगायलाच हवी..

कितीही बुद्धिमान मनुष्य असला तरी प्रेम किंवा वासनांपुढे तोही असहाय होऊ शकतो अशी स्त्रीशक्तीची गोष्ट (Power of Women tales) या झारीत भरलेली आहे. हा पुरूष आहे थोर तत्ववेत्ता अ‍रिस्टॉटल आणि त्याच्या पाठीवर झालेली स्त्री आहे फिलीस ! ही मध्ययुगीन आख्यायिका आहे. यात तत्त्वज्ञ अरिस्टॉटल यांना फिलीस नावाच्या स्त्रीने अपमानित केल्याची गोष्ट सांगितली जाते — ती त्याला त्याच्या विद्यार्थ्याच्या, म्हणजे 'अलेक्झांडर द ग्रेट'च्या समोर घोड्यासारखे बसवते आणि त्यांच्यावर स्वार होते.

या कथेनुसार,ॲरिस्टॉटल आपल्या शिष्य अलेक्झांडरला स्त्रियांच्या मोहजाळात न अडकण्याचा सल्ला देतो.पण नंतर तो स्वतःच फिलीसच्या प्रेमात पडतो किंवा फिलीस ठरवूनच त्याला प्रेमात पाडते.आपल्या प्रेमाची खात्री करण्यासाठी ती एक विचित्र मागणी करते — ती म्हणते, “जर तू खरंच मला प्रेम करतोस, तर माझ्या घोड्यासारखा चार पायांवर उभा रहा आणि मला तुझ्या पाठीवर बसू दे.”फिलीस हे सर्व असे रचते की अलेक्झांडरने हा प्रसंग पाहावा.अरिस्टॉटल प्रेमाच्या आंधळेपणाने मान खाली घालतो, हातपायांवर उभा राहतो, आणि फिलीस त्याच्यावर स्वार होते. त्यामुळे अरिस्टॉटल आपल्या विद्यार्थ्याच्या समोरच त्यांच्या उपहासाचा विषय बनतो.

ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.कोणतेही ऐतिहासिक संदर्भ या कथेमागे नाहीत.बहुधा इ.स. १२व्या शतकाच्या शेवटी किंवा १३व्या शतकाच्या सुरुवातीला निर्माण झाली असावी आणि फ्रेंच काव्य "Lai d'Aristote" सारख्या साहित्यकृतींमधून लोकप्रिय झाली.असे असले तरी ही आख्यायिका युरोपीय कलांमध्ये फार प्रसिद्ध झाली — शिल्पकला, लाकडी कोरीवकाम, आणि चित्रांमध्ये ती वारंवार दिसते. या चित्रांमध्ये “स्त्रियांची सत्ता” हा मुख्य विषय असतो, जिथे स्त्रिया पुरुषांवर वर्चस्व गाजवताना दाखवल्या जातात.

सांगायचे इतकंच की तुम्ही पण सावध रहा

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!
विज्ञान

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!

प्रकाशाच्या साहाय्याने मेंदूतील पेशींचे नियंत्रण करणाऱ्या 'ऑप्टोजेनेटिक्स' तंत्रज्ञानाचा शोध आणि २०२६ च्या नोबेल पुरस्काराची रंजक गोष्ट.

६ ऑक्टोबर, २०२६

कारखाने, जमीन आणि मशिनरीच्या पलीकडे गेलेली अर्थव्यवस्था!
लाइफस्टाइल

कारखाने, जमीन आणि मशिनरीच्या पलीकडे गेलेली अर्थव्यवस्था!

एनव्हिडीया आणि झोमॅटोच्या मूल्यांकनावरून आज कंपन्यांची खरी ताकद जमिनीवर नसून डेटा, नेटवर्क आणि बौद्धिक संपदेत कशी आहे, याचे विश्लेषण.

५ ऑक्टोबर, २०२६

तुमच्या स्वप्नातल्या घराखाली 'विष' तर पेरलेलं नाही? भाग-२
लाइफस्टाइल

तुमच्या स्वप्नातल्या घराखाली 'विष' तर पेरलेलं नाही? भाग-२

ज्या जमिनीवर तुमची टोलेजंग इमारत उभी आहे, तिचा ५० वर्षांचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? जमिनीच्या प्रदूषणाचा वेध घेणारा लेख.

१३ ऑक्टोबर, २०२६