एका श्रीमंत वैमानिकाचे आयुष्य एका अपघातानंतर कसे पूर्णपणे बदलले, ही त्याचीच कहाणी आहे.
हॉवर्ड ह्यूजेस या जगातला सर्वात श्रीमंत उद्योजक होता, पण त्याच्या आयुष्याचा शेवट एका बंद खोलीत झाला. हे दोघे वेगळे व्यक्ती नसून एकाच व्यक्तीच्या आयुष्यातील दोन टोकाचे पैलू आहेत. २४ जुलै १९४६ रोजी लॉस एंजेलिसच्या परिसरात उड्डाण करत असताना हॉवर्ड ह्यूजेस आपल्या प्रायोगिक XF-11 विमानाची चाचणी घेत होता.
उड्डाणादरम्यान विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते बेव्हर्ली हिल्समधील घरांवर कोसळले. या भीषण अपघातात त्याच्या छातीला आणि बरगड्यांना दुखापत झाली, त्याचे कॉलरबोन मोडले आणि शरीराचा मोठा भाग भाजला. या अपघातनंतरीच्या दीर्घकाळ वेदमांमुळे ह्यूजेस वेदनाशामक औषधांचा वापर वाढवत गेला आणि त्यातून तो ओपिऑइड म्हणजेच अफूसारख्या औषधांवर पूर्णपणे अवलंबून राहिला.
त्याच्या या शारीरिक वेदनांसोबतच मानसिक आरोग्यही ढासळत गेले. त्याच्या या वर्तनामागे गंभीर ऑब्सेसिव्ह-कम्पल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजेच OCD हा मानसिक रोग जडला आणि त्याला जंतूंची प्रचंड भीती वाटू लागली. या मानसिक आजारामुळे त्याचे राहणीमान पूर्णपणे बदलले. त्याच्या खोलीतील खिडक्या कायम बंद ठेवल्या जात आणि धूळ आत येऊ नये म्हणून सर्व फटी सीलबंद केल्या जात.
तो प्रत्यक्ष संवाद पूर्णपणे टाळत असे आणि त्याला एखादा कागद द्यायचा असेल, तर कर्मचाऱ्यांना हात धुण्यापासून ते कागद हाताळण्यापर्यंत अनेक कडक नियम पाळावे लागत. त्याला कोणतीही माहिती किंवा आज्ञा द्यायची असल्यास अनेक सूचना हस्तलिखित चिठ्ठ्यांद्वारे दिल्या जात.
१९६६ मध्ये ह्यूजेस लास वेगासमधील डेजर्ट इन हॉटेलच्या पेंटहाऊसमध्ये राहायला आला. हॉटेल व्यवस्थापनाने काही कारणास्तव खोली रिकामी करण्यास सांगितल्यानंतर संतापलेल्या ह्यूजेसने सुमारे १ कोटी ३० लाख डॉलर खर्च करून थेट संपूर्ण हॉटेलच विकत घेतले. भारतीय चलनानुसार हा आकडा कोटींच्या घरात जातो.
हॉटेल विकत घेतल्यावर पुढील चार वर्षे तो हॉटेलच्या वरच्या मजल्यावरच राहिला आणि कधीही बाहेर पडला नाही. जमिनीवरील जंतूंचा संसर्ग होऊ नये म्हणून तो चालताना पायांना टिश्यू बॉक्स घालून बसायचा. संपत्तीच्या बाबतीत जगात पुढे असलेला हा माणूस स्वतःच्याच भीतीचा कैदी बनला होता.
५ एप्रिल १९७६ रोजी ह्यूजेस अमेरिकेतील ह्यूस्टन येथे वैद्यकीय उपचारांसाठी विमानाने जात असताना वयाच्या ७० व्या वर्षी मरण पावला. त्याची प्रकृती इतकी खालावली होती की, मृत्यूनंतर त्याची ओळख निश्चित करण्यासाठीही अधिकाऱ्यांना खूप प्रयत्न करावे लागले. शेवटी त्याच्या शरीरावरून घेतलेल्या बोटांच्या ठशांच्या आधारावरच त्याची ओळख पटवण्यात आली.






