मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

अहंकार की आत्मविश्वास? जागतिक अहंकार जागरूकता दिनानिमित्त विशेष विश्लेषण

3 मिनिट वाचन

जागतिक अहंकार जागरूकता दिनानिमित्त अहंकार आणि आत्मविश्वास यातील फरक आणि मानसिक आरोग्यासाठी नम्रतेचे महत्त्व सांगणारे विश्लेषण.

शेअर करा:
अहंकार की आत्मविश्वास? जागतिक अहंकार जागरूकता दिनानिमित्त विशेष विश्लेषण

"लहानपण देगा देवा,मुंगी साखरेचा रवा." हे केवळ आध्यात्मिक वचन नाही, तर ते उत्तम मानसिक आरोग्याचं सूत्र आहे. तुमचा 'मी'पणा म्हणजे आत्मविश्वास नाही.'वर्ल्ड ईगो अवेअरनेस डे' निमित्त विशेष विश्लेषण

तुम्हाला वाटतं की तुमचा ताठ कणा आणि जबरदस्त 'अ‍ॅटिट्यूड' म्हणजे तुमचा आत्मविश्वास आहे? तर तुम्ही स्वतःचीच फसवणूक करत आहात. विज्ञानाच्या भाषेत, फुगलेला अहंकार हा आत्मविश्वासाचं लक्षण नसून तुमच्या मनातील खोलवर असलेल्या असुरक्षिततेचा पुरावा आहे.ज्याला आपण 'स्वाभिमान' समजतो, तो अनेकदा 'अहंकार' असतो. आज ११ मे, 'जागतिक अहंकार जागरूकता दिवस' (World Ego Awareness Day). २०१७-१८ मध्ये डॉ. ज्योतिका छिब्बर आणि 'ईगो अवेअरनेस मुव्हमेंट'ने या दिवसाची सुरुवात केली. आज २०२६ मध्ये, सोशल मीडियाच्या 'सेल्फी' संस्कृतीत हा दिवस अधिक महत्त्वाचा ठरत आहे.

अहंकार हा केवळ एक स्वभावदोष नसून तो एक मानसिक आजार बनत चालला आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते, अतिरेकी अहंकारामुळे माणूस स्वतःच्याच कल्पनेत गुंतून राहतो. यामुळे समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्याची त्याची क्षमता संपते. परिणामी, नातेसंबंधांत दुरावा आणि कामाच्या ठिकाणी संघर्ष निर्माण होतो.आपल्या मेंदूतील 'डिफॉल्ट मोड नेटवर्क' (DMN) मध्ये अहंकाराचं मूळ असतं. जेव्हा हे नेटवर्क अतिसक्रिय होतं, तेव्हा माणूस सतत स्वतःबद्दलच विचार करू लागतो. यातूनच चिंता, नैराश्य आणि असुरक्षितता वाढते. अहंकारी व्यक्तीला सतत इतरांकडून मान्यतेची गरज असते, जी कधीच पूर्ण होत नाही.

मग यावर उपाय काय? संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगितलं होतं, "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा." हे केवळ आध्यात्मिक वचन नाही, तर ते उत्तम मानसिक आरोग्याचं सूत्र आहे. स्वतःच्या चुका मान्य करणं ही कमजोरी नसून ती खरी ताकद आहे. अहंकार कमी झाला की, संवाद सुधारतो आणि मानसिक शांतता मिळते.आजच्या दिवशी केवळ इतरांच्या अहंकारावर बोट ठेवण्यापेक्षा स्वतःच्या वागण्याचं परीक्षण करा. अहंकार हा डोळ्यावर बांधलेल्या पट्टीसारखा असतो, जो आपल्याला सत्य पाहू देत नाही. आपल्या अहंकाराचा 'बॅड डे' हा आपल्या चारित्र्यासाठी आणि मनासाठी 'गुड डे' ठरू शकतो.

स्वतःला आरशात पाहताना फक्त बाह्य रूप न पाहता, आपल्यातील 'मी'पणा किती वाढलाय हे तपासणं गरजेचं आहे. नम्रता हा दुर्बळपणा नसून तो प्रगल्भतेचा सर्वोच्च बिंदू आहे, हे आज आपण समजून घ्यायला हवं.आपल्या अहंकाराचा फुगा फुटल्याशिवाय आपल्याला वास्तवाचं आकाश मोकळं दिसत नाही.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

'परफेक्ट' माणसाच्या मुखवट्यामागचं भयानक सत्य: सिग्मंड फ्रॉइडचा इशारा!
लाइफस्टाइल

'परफेक्ट' माणसाच्या मुखवट्यामागचं भयानक सत्य: सिग्मंड फ्रॉइडचा इशारा!

सोशल मीडियावर स्वतःला परफेक्ट दाखवणाऱ्यांच्या मनात काय चाललेलं असतं? मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉइड यांनी दिलेला हा इशारा नक्की वाचा.

२४ फेब्रुवारी, २०२६

एक फोन करा, संवाद सुरू करा: जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त विशेष
आरोग्य

एक फोन करा, संवाद सुरू करा: जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त विशेष

नैराश्यात असलेल्या व्यक्तीला सावरण्यासाठी एक साधा संवाद किती महत्त्वाचा ठरतो? जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त हा लेख नक्की वाचा.

१० सप्टेंबर, २०२६