'मला काय होत नाही रे दोन दिवस गोळी घ्यायची राहिली तर...' असं म्हणणारी वडीलधारी मंडळी तुमच्या आमच्या घरात असतातच ! पण असा निष्काळजी आणि अति -आत्मविश्वास धोकादायकठरू शकतो.
आज जागतिक रक्तदाब दिनाच्या निमित्ताने बोभाटाच्या तरुण वाचकांना एक आवाहन ! घरातील रक्तदाबाचा विकार असलेली वडीलधारी मंडळी रक्तदाबाच्या गोळ्या वेळेवर घेतात का यावर नजर ठेवा.
औषधे न घेण्याचे 'विस्मरण' हे मुख्य कारण असते.तुम्हीच मॉनीटरचे काम करा !
आता रक्तदाब मोजणारे मशिन सहज उपलब्ध असते.आठवड्यातील एक दिवस ब्लड प्रेशर दिन नक्की करा आणि नोंद ठेवा."रक्तदाब अचूक मोजा, नियंत्रणात ठेवा आणि दीर्घायुष्य जगा!" पण ही सूचना फक्त वृध्दांसाठी नाही.कामाच्या ताणामुळे तरूणांना पण हा विकार लवकर जडू शकतो.तुम्हीही "रक्तदाब अचूक मोजा, नियंत्रणात ठेवा आणि दीर्घायुष्य जगा!"
काही महत्वाच्या गोष्टी :
१ शारीरिक हालचाल वाढवा,नियमित व्यायाम करा- जीमची फी भरता पण जात नाही.
२ जर वजन जास्त असेल,तर ते कमी करा. पोटाच्या ढेरीवर लक्ष ठेवा.
३मैद्यासारखे पांढऱ्या कार्बोहायड्रेट्स आणि साखर आहारात वापर कमी करा- बेकर्री प्रॉडक्ट सोयीची असतात म्हणून त्यांचा वापर जास्त होतो हे लक्षात घ्या.
४ आहारात पोटॅशियम जास्त आणि सोडियम कमी घ्या.एखाद्या पदार्थावर वरून पेरलेले मिठ घातक असते
५ प्रक्रिया केलेल्या (प्रोसेस्ड) अन्नपदार्थांपासून दूर रहा.
६ धूम्रपान आणि मद्यपान टाळा. खिसा आणि आयुष्य वाया घालवू नका
७ जास्त ताण-तणाव कमी करा. वादविवाद टाळा-
८ पुरेशी झोप घ्या. झोपताना मोबाईल दूर ठेवा. इन्स्टा उद्यापण बघता येईल.
९आहारात जास्त लसूण किंवा लसूण अर्काचे सप्लिमेंट्स घ्या. हे काम आई -आज्जी - पत्नी करतीलच.
१०पोषणमूल्य असलेले उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ भरपूर प्रमाणात घ्या. शाकाहार- मांसाहार दोन्ही जीवनशैलीत असे पदार्थ असतात. त्याची यादी करा.
११ कॅफिनचे प्रमाण कमी करा. चहा -कॉफी > अॅसिडीटी> झोप न लागणे> अशा साखळीत सापडू नका.






