मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

नोटा छापल्या पण त्या बनावट नव्हत्या! पोर्तुगालच्या 'त्या' भामट्याची अजब गोष्ट

3 मिनिट वाचन

पोर्तुगालच्या मध्यवर्ती बँकेची खोटी कागदपत्रे बनवून सरकारी प्रेसमधून खऱ्याखुऱ्या नोटा छापणाऱ्या आर्टुर रेईसची अजब कथा.

शेअर करा:

आज आपण ज्याला 'आर्थिक घोटाळा' म्हणतो, त्याची व्याख्याच बदलून टाकणाऱ्या आर्टुर व्हर्जिलियो अल्विस रेईस या माणसाची ही गोष्ट सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. कारण मे २०२६ मध्ये पार पडलेल्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये (Cannes Film Festival) याच आर्टुरवर आधारित 'द मॅन हू स्टोल पोर्तुगाल' (The Man Who Stole Portugal) हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि जगभरातील प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या.

१९२५ साली पोर्तुगालच्या एकूण अर्थव्यवस्थेपैकी १% संपत्ती ही बँकेने नाही, तर एका साध्या भामट्याने आपल्या घरात बसून तयार केली होती. ही कोणतीही बनावट नोटांची टोळी नव्हती, तर चक्क सरकारी प्रेसमध्ये छापलेल्या 'अस्सल' नोटांचा महापूर होता.

आता कहानीमें ट्विस्ट ...कल्पना करा, तुम्हाला नवीन नोटा छापायच्या आहेत. तुम्ही काय कराल? चोरून छपाई कराल? आर्टुरने तसं केलं नाही. त्याने थेट पोर्तुगालच्या मध्यवर्ती बँकेची खोटी कागदपत्रं आणि सह्या तयार केल्या. या कागदपत्रांच्या जोरावर त्याने लंडनच्या 'वॉटर्लू अँड सन्स' या नामांकित कंपनीला गाठलं.
आता पुढे ऐका. ही 'वॉटर्लू अँड सन्स' म्हणजे साधीसुधी कंपनी नव्हती. ती अधिकृतपणे पोर्तुगालच्या नोटा छापायची. आर्टुरने त्यांना इतक्या आत्मविश्वासाने गंडवलं की,त्यांनी चक्क ५०० एस्कुडोच्या २ लाख नोटा छापून त्याच्या हातात दिल्या.

नोटा खऱ्या, पण मालक खोटा! या घोटाळ्याची सर्वात मोठी गंमत म्हणजे, त्या नोटा 'बनावट' नव्हत्याच. कागद तोच, शाई तीच, डिझाइन तेच आणि सिरीयल नंबरही अधिकृत! तांत्रिकदृष्ट्या त्या नोटा पूर्णपणे कायदेशीर होत्या, कारण त्या सरकारी यंत्रणेनेच छापल्या होत्या. फक्त त्या छापण्याचा आदेश देणारा माणूस सरकारी नव्हता.

आर्टुरने या पैशांच्या जोरावर पोर्तुगालमध्ये स्वतःची बँक उघडली. त्याने इतका पैसा बाजारात ओतला की, एका क्षणी पोर्तुगालच्या अधिकृत बँकेपेक्षा जास्त चलन या एका माणसाच्या नियंत्रणात होतं. यामुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आणि महागाई गगनाला भिडली..आणि मग काय झालं?
तपासाची चक्रे फिरली. पोलिसांनाही सुरुवातीला वाटलं की हे बनावट नोटांचं रॅकेट आहे, पण जेव्हा त्यांना समजलं की या नोटा तर 'रिअल' आहेत, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

आपल्याकडे जसा 'नटवरलाल' प्रसिद्ध आहे, ज्याने ताजमहाल विकला होता, तसाच हा आर्टुर. त्याने तर अख्ख्या देशाची करन्सीच आपल्या खिशात घातली होती. मराठीत आपण म्हणतो , "चोराच्या उलट्या बोंबा", पण इथे तर चोराने चक्क पोलीस आणि बँकच बोंबलत होते.

थॉमस नॅपर दिग्दर्शित आणि जेम्स नेल्सन जॉयस याचा (The Man Who Stole Portugal) या चित्रपटामुळे ही १०० वर्ष जुनी गोष्ट आज पुन्हा घराघरात पोहोचली आहे. आर्टुरने सिद्ध केलं की, सिस्टीममध्ये जर एखादं लहानसं छिद्र असेल, तर एखादा डोकं चालवणारा माणूस अख्ख्या देशाला वेडं बनवू शकतो.
जर तुमच्या खिशातली नोट १००% खरी असूनही ती बेकायदेशीर ठरली, तर तुमची अवस्था काय होईल?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

खऱ्या छापखान्यात छापल्या 'बनावट' नोटा: पोर्तुगालला हादरवणारा घोटाळा
लाइफस्टाइल

खऱ्या छापखान्यात छापल्या 'बनावट' नोटा: पोर्तुगालला हादरवणारा घोटाळा

नोट खऱ्या सरकारी छापखान्यात, खऱ्या साच्यावर छापलेली असेल, तर ती बनावट कशी ठरणार? जवळपास शंभर वर्षांपूर्वी पोर्तुगालमध्ये एका महाभामट्याने हाच प्रश्न प्रत्यक्षात उतरवला.

२ नोव्हेंबर, २०२६

SBI ठरली जगातील सर्वोत्तम बँक, पण सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चा!
लाइफस्टाइल

SBI ठरली जगातील सर्वोत्तम बँक, पण सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चा!

Global Finance या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने SBI ला ‘World’s Best Consumer Bank’ हा बहुमान दिला आहे. पण सोशल मीडियावर मात्र बँकेच्या सेवेवरून भन्नाट विनोद व्हायरल होत आहेत.

२१ ऑक्टोबर, २०२६

गोव्यातील ५,५८४ कुटुंबांच्या सोन्याची ३० वर्षांची 'कैद'; आजच्याच दिवशी परतला तो खजिना!
लाइफस्टाइल

गोव्यातील ५,५८४ कुटुंबांच्या सोन्याची ३० वर्षांची 'कैद'; आजच्याच दिवशी परतला तो खजिना!

पोर्तुगीजांनी पळवून नेलेले गोवेकरांचे ५,५८४ दागिन्यांची पाकिटे ३० वर्षांच्या मुत्सद्देगिरीनंतर ३ ऑगस्ट १९९१ रोजी भारतात परत आली.

३ ऑगस्ट, २०२६

गंजलेल्या तलवारीच्या वजनाइतके सोने: एका वृद्ध स्त्रीच्या चातुर्याची गोष्ट
लाइफस्टाइल

गंजलेल्या तलवारीच्या वजनाइतके सोने: एका वृद्ध स्त्रीच्या चातुर्याची गोष्ट

बोलण्याने हत्ती मिळवता येतो आणि बोलण्यानेच हत्ती गमावताही येतो. अवधच्या नवाबांच्या काळातली, बोलण्याच्या कलेची ताकद सांगणारी एक सुरेख गोष्ट.

२ नोव्हेंबर, २०२६

सोन्याच्या खाणी, तरीही गरीब: बुर्कीना फासो देशाची कहाणी
लाइफस्टाइल

सोन्याच्या खाणी, तरीही गरीब: बुर्कीना फासो देशाची कहाणी

या देशाचे उत्पन्न दोन प्रकारच्या सोन्यावर अवलंबून आहे: खाणीतले सोने आणि कापूस. तरीही ५०% हून अधिक जनता दारिद्र्य रेषेखाली जगते आहे.

३० ऑक्टोबर, २०२६

३८ जणांची हत्या करून मांस खाल्ल्याचा आरोप: युगांडातील भयावह प्रकरण
लाइफस्टाइल

३८ जणांची हत्या करून मांस खाल्ल्याचा आरोप: युगांडातील भयावह प्रकरण

माणूस माणसाला खातो? युगांडात मुजुरिझी मोझेस नावाच्या व्यक्तीवर पंधरा वर्षांत ३८ जणांची हत्या करून त्यांचे मांस खाल्ल्याचा आरोप आहे. हे आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.

३० ऑक्टोबर, २०२६