मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

पावरी हो रही है आणि श्वेताचं मार्केट खाणारा हा चाचा आहे तरी कोण? ह्या व्हायरल फोटोमागची गोष्ट वाचा !!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
पावरी हो रही है आणि श्वेताचं मार्केट खाणारा हा चाचा आहे तरी कोण? ह्या व्हायरल फोटोमागची गोष्ट वाचा !!

सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील बागपतचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. तेथील पाणीपुरी विक्रेत्यांमध्ये भांडण झाले आणि चक्क WWF सारखी फ्याटिंग सुरू झाली. व्हिडीओ वायरल होण्यासाठी एवढी गोष्ट देखील पुरेशी होती, पण यापेक्षा जास्त व्हायरल मात्र दुसरीच गोष्ट होत आहे. 

जवळपास १५-२० लोक काठ्यांनी एकमेकांना मारत आहेत असा तो व्हिडीओ होता. पण या व्हिडिओत असणारे एक वयस्कर गृहस्थ मात्र त्यांच्या भन्नाट हेयरस्टाईलमूळे चांगलेच व्हायरल झाले आहेत. कालपासून मिम्सचा पाऊस सुरू झाला आहे.

बागपत मधील मार्केटमध्ये एका ओळीत काही लोक पाणीपुरी विकतात, एका ग्राहकाला स्वतःकडे बोलविण्याच्या मुद्यावरून सुरू झालेले भांडण थेट फ्री स्टाईल हाणामारीत परिवर्तित झाले. ट्विटरवर यानंतर #chacha हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

या फायटिंगचा खरा विजेता चाचा आहे हे लोकांनी घोषित केले आहे. तसेच चाचाच्या हेयरस्टाईलची तुलना आईन्स्टाईनपासून तर थ्री इडियटमधल्या वायरसपर्यँत केली जात आहे. 

पावरी हो रही है आणि श्वेताचं मार्केट खाणारा हा चाचा आहे तरी कोण? ह्या व्हायरल फोटोमागची गोष्ट वाचा !! – चित्र 1

पण व्हायरल झाला असला तरी चाचाला तुरुंगाची हवाही खावी लागली आहे. काहीही म्हणा पण चाचाने पावरी हो रही है आणि श्वेता मिम्सचे मार्केट डाऊन केले आहे हे नक्की...

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलSBI ठरली जगातील सर्वोत्तम बँक, पण सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चा!Global Finance या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने SBI ला ‘World’s Best Consumer Bank’ हा बहुमान दिला आहे. पण सोशल मीडियावर मात्र बँकेच्या सेवेवरून भन्नाट विनोद व्हायरल होत आहेत.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

सरोगेट ॲडव्हर्टायझिंग म्हणजे काय? विमल इलायचीवरून का सुरू झाला वाद?
लाइफस्टाइल

सरोगेट ॲडव्हर्टायझिंग म्हणजे काय? विमल इलायचीवरून का सुरू झाला वाद?

प्रतिबंधित उत्पादनांची पर्यायी वस्तूंच्या नावाखाली होणारी छुप्या जाहिरातबाजी आणि त्यावर एफडीएने घेतलेल्या आक्षेपाची माहिती.

१७ ऑगस्ट, २०२६

मोदी-मेलनींची ती 'मेलडी' आणि दलाल स्ट्रीटवरची 'कॉमेडी'!
लाइफस्टाइल

मोदी-मेलनींची ती 'मेलडी' आणि दलाल स्ट्रीटवरची 'कॉमेडी'!

पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलनी यांच्या 'मेलडी' चर्चेमुळे गुंतवणूकदारांनी चुकून पार्ले इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी केल्याची रंजक गोष्ट.

२१ मे, २०२६