मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

सरोगेट ॲडव्हर्टायझिंग म्हणजे काय? विमल इलायचीवरून का सुरू झाला वाद?

3 मिनिट वाचन

प्रतिबंधित उत्पादनांची पर्यायी वस्तूंच्या नावाखाली होणारी छुप्या जाहिरातबाजी आणि त्यावर एफडीएने घेतलेल्या आक्षेपाची माहिती.

शेअर करा:
सरोगेट ॲडव्हर्टायझिंग म्हणजे काय? विमल इलायचीवरून का सुरू झाला वाद?

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना ‘विमल इलायची’च्या जाहिरातीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

‘विमल’ हे नाव पान मसाल्याशी जोडलेले असून, महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला’ची अप्रत्यक्ष जाहिरात ‘विमल इलायची’च्या माध्यमातून केली जात असल्याचा FDA ला संशय आहे.

पण ‘सरोगेट ॲडव्हर्टायझिंग’ म्हणजे काय ते आता वाचूया.

सरोगेट ॲडव्हर्टायझिंग (Surrogate Advertising) म्हणजे एखाद्या थेट जाहिरात करण्यावर कायदेशीर निर्बंध असलेल्या उत्पादनाची अप्रत्यक्षपणे जाहिरात करण्याची पद्धत. विशेषतः दारू, तंबाखू किंवा इतर प्रतिबंधित उत्पादनांच्या बाबतीत ही पद्धत वापरली जाते.

कायद्यामुळे एखाद्या कंपनीला दारूची थेट जाहिरात करता येत नसेल, तर ती त्याच ब्रँडच्या नावाने मिनरल वॉटर, सोडा, म्युझिक सीडी किंवा इतर कायदेशीर उत्पादनाची जाहिरात करते. जाहिरातीत दिसणारे उत्पादन वेगळे असले तरी ब्रँडचे नाव, लोगो, रंग, पॅकेजिंग आणि सेलिब्रिटी हे मूळ प्रतिबंधित उत्पादनाची आठवण करून देतात.

हे नेमके कसे केले जाते ?

१. पर्यायी उत्पादन: कंपनीतर्फे त्याच नावाचे दुसरे कायदेशीर उत्पादन बाजारात आणले जाते—उदा. सोडा किंवा मिनरल वॉटर.

२. ब्रँडची आठवण कायम जागती ठेवणे हा उद्देश असल्याने : जाहिरात सोड्याची असली तरी ग्राहकांच्या मनात त्याच नावाचा दारूचा ब्रँड पुन्हा ठसतो.

३. सेलिब्रिटी आणि कार्यक्रमांचा वापर: क्रिकेट, संगीत कार्यक्रम किंवा इतर मोठ्या कार्यक्रमांना त्याच ब्रँडच्या नावाने प्रायोजित केले जाते.

समजा एखाद्या ‘XYZ Whisky’ या ब्रँडची थेट जाहिरात करता येत नाही. कंपनी ‘XYZ Soda’ नावाचा सोडा बाजारात आणते. जाहिरातीत सोडा दाखवला जातो; पण लोगो, रंग, संगीत, सेलिब्रिटी आणि ब्रँडची ओळख अगदी Whisky सारखीच ठेवली जाते.ग्राहकाच्या मनात मात्र XYZ = Whisky हीच ओळख कायम राहते.

याला विरोध का होतो आहे ? सरोगेट जाहिरातीवर मुख्य आक्षेप असा आहे की कायद्याने थेट जाहिरात बंद केली असतानाही तिचा उद्देश अप्रत्यक्षपणे साध्य केला जातो.

यामुळे:जाहिरातीवरील कायदेशीर निर्बंधांचा उद्देशच निष्फळ होऊ शकतो. तरुणांमध्ये दारू किंवा तंबाखूच्या ब्रँडची ओळख आणि आकर्षण वाढू शकते.सेलिब्रिटींच्या माध्यमातून अशा ब्रँडची लोकप्रियता वाढू शकते.

थोडक्यात:

“उत्पादनाची जाहिरात करता येत नसेल, तर त्याच ब्रँडच्या दुसऱ्या उत्पादनाची जाहिरात करून ग्राहकांच्या मनात मूळ उत्पादनाची आठवण जिवंत ठेवणे म्हणजे सरोगेट ॲडव्हर्टायझिंग.”

याच कारणामुळे ‘Vimal Elaichi’ची जाहिरात खरोखर इलायचीची आहे की त्यामागे ‘Vimal Pan Masala’ची अप्रत्यक्ष जाहिरात आहे, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

संवेदनशीलतेचा अंत? फ्लिपकार्टच्या 'त्या' जाहिरातीवरून रणकंदन
लाइफस्टाइल

संवेदनशीलतेचा अंत? फ्लिपकार्टच्या 'त्या' जाहिरातीवरून रणकंदन

वृत्तपत्रातील श्रद्धांजलीच्या पानावर सेलची जाहिरात छापल्यामुळे फ्लिपकार्टवर सोशल मीडिया आणि सामान्य नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

२० ऑगस्ट, २०२६

जर तुम्ही गरोदर राहिला असतात तर? जाहिरात विश्वातला एक क्रांतीकारी संदेश!
लाइफस्टाइल

जर तुम्ही गरोदर राहिला असतात तर? जाहिरात विश्वातला एक क्रांतीकारी संदेश!

कुटुंब नियोजनाची जबाबदारी पुरुषांचीही आहे, हा संदेश देणाऱ्या जगातील एका सर्वात प्रभावी जाहिरातीचा इतिहास.

१ जून, २०२६

एका मासिकातून दरमहा ३ कोटींची कमाई: इंडिगोचे एक अजब बिझनेस मॉडेल
लाइफस्टाइल

एका मासिकातून दरमहा ३ कोटींची कमाई: इंडिगोचे एक अजब बिझनेस मॉडेल

विमानात ठेवल्या जाणाऱ्या 'हॅलो ६ई' मासिकातून इंडिगो एअरलाइन्स दरमहा ३ कोटी रुपये जाहिरातींतून कशी कमावते, याचे रंजक गणित.

१५ जून, २०२६

एका 'बायकी' ब्रँडला पुरुषांचा ब्रँड बनवणारा जादूगार: लिओ बर्नेट आणि मार्लबोरोची गोष्ट
लाइफस्टाइल

एका 'बायकी' ब्रँडला पुरुषांचा ब्रँड बनवणारा जादूगार: लिओ बर्नेट आणि मार्लबोरोची गोष्ट

महिलांसाठी सुरू झालेल्या फ्लॉप सिगारेटला एका काउबॉयच्या कल्पनेने पुरुषांचा नंबर वन ब्रँड कसा बनवला, वाचा मार्लबोरोची कथा.

६ जुलै, २०२६