१०० च्या नव्या नोटेबद्दल या ५ गोष्टी माहित आहे का भौ ??
मंडळी, एक एक करून सर्व नोटा नवीन होत गेल्या. उरलेली फक्त एकच, १०० ची नोट. आता तिचाही नंबर लागलेला आहे भौ. रिझर्व्ह बँकतर्फे यावेळी १०० च्या नोटेचा कायापालट होणार आहे. येत्या ऑगस्टपर्यंत नवी नोट बाजारात येईल. ही नोट कशी असेल? त्यावर कोणती ऐतिहासिक वास्तू छापलेली असेल? चला तर या नोटेबद्दल महत्वाचे मुद्दे जाणून घेऊया :
१. १०० ची नवी नोट फिकट जांभळ्या रंगात असेल. ही नोट पूर्वीच्या नोटेपेक्षा आकाराने लहान असेल.
२. नोटेवर गुजरातच्या ‘रानी की बाव’ चा फोटो असेल. रानी की बाव ही एक ऐतिहासिक विहीर आहे आणि तिला २०१४ साली युनिस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामील करण्यात आलंय.
३. नवीन नोट आली म्हणून जुनी नोट बाद होणार नाही. जुनी नोट त्यानंतरही चलनात राहील.
४. नव्या नोटेची छपाई देवास येथील प्रिंटिंग प्रेसमध्ये केली जात आहे.
५. नव्या नोटचा आकार बघता ATM मध्ये बदल करावे लागणार आहेत. यापूर्वी नव्या नोटा आल्या होत्या, तेव्हा सुद्धा असे बदल करण्यात आले होते.
तर मंडळी अशा प्रकारे सर्व नोटांचा मेकओव्हर झालेला आहे. आपल्याला तक्रार होती की १०० ची नोट ५०० पेक्षा मोठी आहे, मग ती मागे ठेवायची की पुढे!! तर आता असा प्रश्न येणार नाही भाऊ.