देशविदेशातल्या लग्नांचे लईभारी पोशाख...बघा एखादा पसंद पडतोय का !!!
सध्या काय हाय ना भौ, 'लग्नावळा' आलाय. जसा हिवाळा, पावसाळा, उन्हाळा तसा लग्नावळा ! काय कळ्ळा?
आता लग्नाचा मौसम म्हटल्यावर नवरा नवरी कशे हिरो हिरोईन होतात अन एकदम ढिंच्याक दिसतात. सगळ्यांना हौस असती लग्नात एका दिवसाचा सेलेब्रिटी होण्याची. नंतर आयुष्यभर बायकोच्या पाठी स्पॉटबॉय म्हणून काम करतात ते वेगळं. हे फक्त इंडियात नाय हां..सगळ्यात जगात अगदी शेम टू शेम.
इंडिया असो की पाकिस्तान, कोरिया असो कि जपान.. सगळे नवरा नवरी कसे सारखेच. मग फरक काय? तर, तिकडचे कपडे आणि वेशभूषा हे जाम वेगळे. आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असेच वेगवेगळ्या देशातले काही जोडपे दाखवणार आहोत. तिकडच्या लग्नाच्या पद्धती, संस्कृती बघून थक्क व्हाल !!!
१. बाली - इंडोनेशियातील एक बेट !
२. घाना - पश्चिम आफ्रिका !
३. चीन !
४. भारत !
५. हवाई - अमेरिका !
६. पाकिस्तान !
७. मलेशिया !
८. नॉर्वे !
९. रोमानिया !
१०. द. कोरिया !
११. श्रीलंका !
१२. रशिया !
१३. जपान !
१४. नायजेरिया - आफ्रिका !
१५. इंडोनेशिया !
१६. येमेनी ज्यू !
१७. टर्की (तुर्कस्तान) !
१८. हंगरी !
१९. अरब !
२०. मंगोलिया !
शेवटी माणसं कितीही वेगळी असली तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र एकच आहे ! खरं ना ?