computer

आता गाडी थेट पार्क करा रेल्वे प्लॅटफॉर्मवर - हडपसर स्टेशनवर नवी सुविधा

रेल्वेने कुठे जायचे म्हटले तर रेल्वे स्टेशननजीक गाडी कुठे पार्क करायची हा पहिला विचार मनात येतो स्टेशनबाहेर गाडी पार्क करण्यासाठी जागा शोधा, मग सामान घेऊन प्लॅटफॉर्मवर जा या गोष्टीला कुणीही कंटाळेल.या पुढे मात्र ही समस्या राहणार नाही असे दिसते. 

पुण्यातील हडपसर स्टेशनवर प्लॅटफॉर्म पार्किंगची सोय करण्यात आली आहे. हडपसर हे असा प्रयोग करणारे महाराष्ट्रातील पहिले स्टेशन ठरणार आहे.प्रवासी प्लॅटफॉर्मच्या आत गाडी घेऊन जाऊ शकतील.तिथेच गाडी पार्क करण्याची सोय असेल. 

कोलकाता येथील हावडा रेल्वे स्टेशनवर हा प्रयोग आधी झाला होता.यामुळे लोकांच्या वेळेची पण बचत होईल आणि स्टेशन बाहेर होणारी गाड्यांची गर्दी कमी होण्यासही मदत होईल.हडपसर रेल्वे स्टेशनवर सध्या चार प्लॅटफॉर्म आणि एक फूट ओव्हरब्रिज आहे.

येथील रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हडपसर रेल्वे स्टेशनवर अनेक नव्या सुधारणा होत आहेत. नव्या अनेक गाड्या या स्टेशनवरून सुरू करण्यात येत आहेत. यात हडपसर ते हैदराबाद डेली स्पेशल रेलवे सुरू होत आहे. सोबतच इतरही काही गाड्या सुरू होणार आहेत. यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळ पार्किंगची जागा असल्यास प्रवासींना थेट गाडी पकडणे शक्य होणार आहे. 

सध्या ही पार्किंगची जागा लहान असली तरी ती हळूहळू मोठी करण्यार येणार आहे. हडपसर रेल्वे स्टेशनवरून गाड्या जाण्याची संख्या २२ कोच ट्रेन्सपर्यन्त वाढवण्यात आली आहे. मुंढवा- खराडी बायपास रोडला असलेले हे स्टेशन जवळच्या अनेक परिसरातील लोकांसाठी रेल्वे प्रवासासाठी महत्त्वाचे आहे. 

प्रवासींनी देखील यावर समाधान व्यक्त केले आहे.अधिकाधिक गाड्या सुरू होणे आणि त्यातही पार्किंगला जागा असणे यामुळे जड सामान वाहून नेण्याची कटकट दूर होईल. 

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required