भूतानचा राजा स्वत:च स्वयंपाकाला लागतो तेव्हा...
भूतान हे निसर्गसंवर्धनाला प्राधान्य देणारे राष्ट्र. गेल्या वर्षी तिथल्या जिग्मे सिंग्ये वांग्चुक (Jigme Singye Wangchuck) या राजाने मुलाच्या वाढदिवसादिवशी हजारो रोपे लावली. यावर्षी मोंगार येथील एका मुलांच्या शाळेत पाकसिद्धी करत असलेला फोटो प्रसिद्ध झाल्याने तो पुन्हा चर्चेत आला आहे.
आपल्याला एकूणातच नेते आणि श्रीमंत लोकांना फक्त हुकूम चालवताना पाहण्याची सवय असताना या राजाला साध्याशा वेषात कांदा-मिरची चिरताना पाहाणं हे भलतंच नवीन आहे. आज ट्विटर आणि फेसबुकवर त्याच्या नावाने दुमदुमत आहे.