चिप्सच्या पॅकेट मध्ये हवा का असते राव ? कारण वाचून खुश व्हाल !!
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/field/image/PepsiCoFritoLay_0.png?itok=EbcmIc7F)
भूक लागली म्हणून चिप्सचं पॅकेट उघडलं की आतून फक्त हवाच निघते राव. आपण हवेसाठी पैसे देतो की काय असं वाटू लागतं. या कंपन्या आपल्याला फसवतात असं कोणालाही वाटेल पण खूप कमी लोकांना माहित आहे की पॅकेट मध्ये ही हवा नसेल तर चिप्स खातच येणार नाही....राव, आज या मागचं कारण वाचून घ्या...
मंडळी असं आहे, फॅक्टरी मध्ये चिप्स तयार केल्या नंतर ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्या पर्यंत बऱ्याच दिवसांचा कालावधी लागू शकतो. या मधल्या वेळेत चिप्स खराब होऊ नये आणि खाणाऱ्याला ते ताजे आणि क्रिस्पी मिळावेत म्हणून पॅकेजिंग करतानाच पॅकेट मध्ये नायट्रोजन गॅस भरली जाते.
नायट्रोजन वायू चिप्स ताजे ठेवण्याबरोबरच पॅकेट मध्ये बॅक्टेरिया वाढू देत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा पॅकेट उघडता तेव्हा तुम्हाला नुकतीच तयार केल्या सारखी ताजी आणि क्रिस्पी चिप्स मिळतात.
अश्या पद्धतीच्या पॅकेजिंगने आणखी काही गोष्टी सध्या होतात. पहिली गोष्ट म्हणजे एअर टाईट असल्याने चिप्स तयार झाल्या पासून ग्राहकांच्या हातात येई पर्यंत त्याचा भुगा झालेला नसतो. दुसरी बाब म्हणजे जर चिप्सचा पॅकेट पिचकलेला असेल तर त्यातील चिप्स खराब झाले असतील हे आपण लगेच ओळखू शकतो. तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीला यामुळे फायदाच फायदा आहे कारण ग्राहकांना आकर्षित करायला हीच हवा कामी येते.
“जो दिखता है, वही बिकता है बॉस !!”