computer

एका रात्रीत झालेला सुपरस्टार JCB.....हे मीम्स कुठून आले समजून घ्या !!

मंडळी काल अचानक इंटरनेटवर तुम्ही आला आणि सगळीकडे तुम्हाला जेसीबीच्या मशीनच्या फोटोंचा पूर दिसला. तुम्हाला वाटलं असेल, "अरे, मी थोडाच वेळ इंटरनेटवर नव्हतो आणि अचानक असे काय झाले? का ही जेसीबी मशीनचे मीम्स सगळीकडे फिरत आहेत?" तर बोभाटा तुमच्यासाठी त्याचे उत्तर घेऊन आलेला आहे. 

आजवर तुम्ही पाहिलं आहे का रस्त्याच्या कडेला काम चालू आहे,  एक जेसीबी मशीन काहीतरी खोदते आहे.आणि एक पाच पंधरा जणांचा ग्रुप उगाच तिथे उभा आहे. हे लोक दिवसभर उन्हाताणाचा विचार न करता जेसीबी मशीन खोदताना बघत बसतात. त्यातच एका ट्विटर युजरने युट्युबचा स्क्रीन शॉट शेअर केला. त्यात जेसीबी मशीन खोदकाम करत असतानाचे व्हिडिओज लाखों  लोकांनी पहिल्याचे म्हणजेच व्ह्यूज असल्याचे दिसलेय. 

आता आपल्या जनतेला या दोन गोष्टींची सांगड पुरेशी होते. त्यातूनच महापूर आला जेसीबी मीमचा. यातले काही मीम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.  

आजच्या दिवसाच्या सुरवातीला हे मीम्स कुठून आले ते तर समजून घ्या!!

सबस्क्राईब करा

* indicates required