भारतातली सर्वाधिक शिकलेली ट्रक ड्रायव्हर नंदुरबारची योगिता

माहेरची नंदुरबारची असलेल्या योगिता रघुवंशीचं लग्न भोपाळच्या मुलाशी झालं. आधी तो भोपाळच्या कोर्टात काम करतो असं समजलं होतं पण तो निघाला ट्रक ड्रायव्हर. त्याच्या निधनानंतर आपल्या दोन मुलांचं संगोपन करण्यासाठी योगिताला ट्रक ड्रायव्हर बनावं लागलं.

योगिता कॉमर्स म्हणजेच वाणिज्य शाखेची पदवीधारक आहे आणि इतकंच नाही तर ती कायद्याचीही पदवीधर आहे. ति्चं ड्रायव्हर बनणं हे काही स्त्रीमुक्ती किंवा काही सार्वत्रिक समज खोडून काढण्यासाठी नव्हतं. पण आता करिअरला सुरूवात करायची तर कनिष्ठ पदावर सहायिकेची नोकरी आणि नंतर हळूहळू बढती हे तिच्या प्राप्त परिस्थितीला मानवणारं नव्हतं.  उज्ज्वल भविष्यापेक्षा  तिला आताच्या वर्तमानात मुलांना जगवण्यासाठी पैसे हवे होते. भारतासारख्या देशात अशी परिस्थिती असावी ही खरंच नामुष्कीची गोष्ट आहे. 

ती रोज ५०० किलोमीटरचा पल्ला सहज पार करते. तीस टनी वजन असलेल्या १४ टायर्सच्या ट्रकचं प्रचंड धूड ती भोपाळहून केरळलाही घेऊन जाते. योगिताला २०१३ मध्ये ’महिंद्रा ट्रान्सपोर्ट एक्सलन्स पुरस्कारा’च्या स्वरूपात महिंद्राचा एक उच्च क्षमतेचा ट्रकही मिळाला आहे.   स्त्री असल्याचं किंवा उच्च शिक्षण घेतल्याचं कोणतंही अवडंबर न माजवता या पुरूषी क्षेत्रात पाय रोवून उभ्या असलेल्या योगिता रघुवंशीला टीम बोभाटाचा सलाम. 

संदर्भ- दि हिंदु , लिंक्डइन

सबस्क्राईब करा

* indicates required