झोमॅटोने सुरू केलीय नवीन सर्व्हिस, हा व्हिडीओ पाह्यलात का?

मंडळी, झोमॅटोवाल्यांनी आता जेवण पोहोचवण्यासोबत टेस्टिंगचं कामही सुरु केलं आहे !! म्हणजे नेमकं काय ते या व्हिडीओ मध्ये पाहा. झोमॅटोवरून जेवण मागवत असाल तर हा व्हिडीओ पाह्यलाच पाहिजे.

मंडळी, झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने डिलिव्हरी देण्याअगोदर ते स्वतःच टेस्ट करून पाहिलं आहे. राव, ज्या प्रकारे तो एकेक पाकीट उघडून जेवण टेस्ट करत आहे ते पाहून ही झोमॅटोची नवीन सर्व्हिस असावी असंच म्हणता येईल... नाही का ? असो.

तर, हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. तो कुठचा आहे याबद्दल माहिती मिळालेली नाही. ज्या अंकिता नावाच्या ट्विटर युझरने हा व्हिडीओ झोमॅटोच्या नजरेस आणून दिला तिलाही तो व्हॉट्सअॅपवर मिळाला होता.

स्रोत

झोमॅटो पर्यंत हे प्रकरण पोहोचल्यानंतर त्यांनी याविरुद्ध कडक कारवाई करणार असं म्हटलंय. यासाठी ते लवकरच ‘tamper-proof tapes’ वापरणार आहेत. tamper-proof tape एक प्रकारे ‘सील’चं काम करतं. ही विशिष्ट टेप एकदा लावल्यानंतर जर समजा पाकीटा सोबत छेडछाड केली तर ती लगेचच ओळखता येते. या प्रकारच्या टेप्स सुरक्षेसाठी मोठ्याप्रमाणात वापरल्या जातात. झोमॅटोवाल्यांना हेच याआधी सुचलं असतं तर हा अनर्थ टळला असता.

स्रोत

मंडळी, अशा प्रकरणांमुळे पुन्हा एकदा प्रश्न पडतो - अन्नपदार्थ ऑनलाईन मागवावेत की नाही ? याचं उत्तर तुम्हीच द्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required