computer

गेल्या ३०० वर्षांचा इतिहास डोळ्यासमोर उभा करणारे नकाशांचे प्रदर्शन नक्की बघा !

नकाशे ही गोष्ट अनेकांना अतिशय उत्साहित करते तर अनेकांना नकाशे बोअर वाटतात. सध्याच्या काळात एका क्लिकवर नकाशे मिळतात. मात्र एकेकाळी हे नकाशे शोधावे लागत असत. नकाशे हे अतिशय महत्वाचे साधने आहेत. आज असलेला नकाशा उद्या जसाचा तसा राहणार नाही तसेच तो काल जसा होता तसा आजही राहिलेला नसतो.

कार्टोग्राफी म्हणजे नकाशे बनविण्याची कला नसती तर आजचे जागतिकीकरण शक्य झाले नसते. जग जवळ आले नसते. या नकाशांच्या साह्यानेच जगात अनेक ठीकाणांचा शोध लागू शकला आहे. दुर्मिळ नकाशे हे यामुळेच महत्वाचे दस्तावेज असतात. ते प्राथमिक नकाशे होते ज्यांनी अज्ञात गोष्टींबद्दल उत्सुकता निर्माण केली आणि जगभरातील शोधांना प्रोत्साहन दिले.

तुम्ही म्हणत असाल नकाशांचे महत्व तर मान्य आहे पण हे सांगण्याचे कारण काय? तर मुंबईत तब्बल महिनाभर चालणारे नकाशांचे प्रदर्शन लागत आहे. नकाशाप्रेमींसाठी तर ही पर्वणी आहेच. पण प्रत्येकालाच या प्रदर्शनातील नकाशे बघून जगाचा नव्याने बोध होऊ शकतो. 

हे प्रदर्शन ज्या ठिकाणी होऊ घातले आहे ते ठिकाण १८९ वर्ष जुनी असून मुंबईसह देशभर या जागेला वेगळे महत्व आहे. एशियाटिक लायब्ररी येथे एशियाटिक सोसायटी रोटरी क्लबच्या साहाय्याने हे प्रदर्शन आयोजित करत आहे. एशियाटिक लायब्ररी ही फक्त ग्रीक- रोमन आर्किटेक्टचा भव्य नमुना किंवा जगभरात नावाजलेली लायब्ररी सोसायटी या व्यतिरिक्त अनेक अर्थाने महत्वाची आहे.

स्टेट सेंट्रल लायब्ररी, म्युझियम, स्टेट अर्काईव्ह, स्टॅम्प ऑफिसचे कंट्रोलर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय असे अनेक ठिकाणांसाठी हे ठिकाण ओळखले जाते. गेल्या शनिवार पासून हे प्रदर्शन सुरू झाले असून एप्रिलचा पूर्ण महिना हे प्रदर्शन सुरू असेल. या ठिकाणी असलेले नकाशे गेल्या ३०० वर्षांचा इतिहास आपल्यासमोर उभा करतील.

अतिशय दुर्मिळातील दुर्मिळ नकाशे येथे पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे इथे प्रवेश मोफत आहे. बौद्धिक मेजवानी कुतूहल भागवणे अशा अनेक गोष्टींसाठी हे प्रदर्शन आहे असे म्हणता येऊ शकते. फोर्ट येथील शहीद भगत सिंग रोडवरील टाऊन हॉलच्या दरबार हॉलला हे प्रदर्शन असेल.

मुंबईतील पब्लिकने तर चुकवू नये असे हे प्रदर्शन आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required