खड्डेच खड्डे चोहीकडे.... या उपायाने तरी रस्ते खड्डेमुक्त होतील का?
एकेकाळी टेक्स्टाईल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट म्हणून कापड वापरून रस्ता तयार केला होता. आता महाराष्ट्र शासनही एक आगळावेगळा उपक्रम हाती घेत आहे-प्लास्टिक रोडच्या रूपात.
प्लास्टिकच्या विघटनास वेळ लागतो आणि रोजच्या कचर्यात जमा होणार्या इतक्या सार्या प्लास्टिकची कुठे विल्हेवाट लावायची या प्रश्नाला सध्या तरी एक उत्तर मिळालंय. दर १०० किलो डांबरामागे ३-४किलो प्लास्टिक वापरता येईल. यामुळे रस्त्यांची झीज कमी होईल, डांबर कमी लागून रस्ते बांधणीचा खर्च कमी होईल आणि महत्वाचं म्हणजे कचर्याची समस्याही काहीप्रमाणात सुटेल.
फक्त आपल्याकडे रस्ते बांधून झाल्यावर टेलिफोनच्या वायर्स, पाणीपुरवठा आणि इतर कारणांसाठी रस्ते पुन्हा खणायची प्रशासनाला सवय आहे. त्यावर काही हा प्लास्टिकचा उपाय चालेलसं वाटत नाही.