पैजेवर सांगतो, तुम्ही तुमचा रेकॉर्ड केलेला आवाज ओळखू शकत नाही !!!
आज-काल माणसाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर "गुगल" तुम्ही विचारायच्या आधी तुम्हाला देतो. तरीही आपल्या आळशीपणामुळे आपण अनेक अशा गोष्टी आहेत ज्या गुगलकडे विचारल्याच नाहीत. त्यातीलच एक गोष्ट आहे ती म्हणजे रेकॉर्डिंग मधला आपला आवाज आपण का ओळखू शकत नाही?... जाणुन घेऊयात
तुम्हाला माहिती आहे का रेकॉर्डिंग मध्ये आपला आवाज न ओळखणे हे खूपच सर्वसाधारण आहे. जगातील दहा पैकी सात माणसं रेकॉर्डिंग मधला स्वत:चा आवाज ओळखू शकत नाहीत. आणि त्यामागे महत्त्वाचं कारण आहे ...
जेव्हा आपण इतरांचा आवाज ऐकतो तेव्हा ध्वनी कंपनं आपल्या कानाच्या पडद्यापर्यंत हवे मार्फत येऊन आपल्या कानाच्या पडद्याला कंपन पावतात. जेव्हा आपण स्वतःचा आवाज ऐकतो तेव्हा हीच प्रक्रिया होते, फक्त त्यामध्ये एक गोष्ट वेगळी असते, ती म्हणजे रेकॉर्डिंग दरम्यान जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्या घशातूनही कंपनं निर्माण केली जातात आणि ही कंपनं आपल्यासाठी ध्वनीचा अजून एक स्रोत असतात. त्यामुळे, जेव्हा आपण बोलतो तेव्हा जे आपण ऐकतो ते या दोन्ही कंपनांचं मिश्रण असतं.
पण जेव्हा रेकॉर्डिंग पूर्ण केल्यानंतर आपण ते ऐकायला घेतो तेव्हा तिथे फक्त एकच प्रकारचं कंपन आपल्या कानाच्या पडद्यापर्यंत पोहचत असतं. त्यामुळे, आपण तो आवाज ओळखण्यात अपयशी ठरतो. कारण आपल्याला असा आवाज ऐकायची सवय नसते.
एका संशोधनानुसार, जेव्हा अनेक लोकांनी आपला स्वतःचा आवाज रेकॉर्डिंग मध्ये ओळखण्याचा प्रयत्न केला तेव्हा 38% लोक हे स्वत:चा आवाज ओळखण्यामध्ये अपयशी ठरले. रेकॉर्डिंग मधला आपला आवाज हा आपल्याला नेहमीच मोठ्या पट्टीतील वाटत असतो आणि त्यामुळे आपला मेंदू आपल्याला चुकीची माहिती पुरवत राहतो आणि आपण तो आवाज ओळखण्यात गफलत करतो.
लेखक : रोहित लांडगे