IPL थरार: मॅच ३ दिल्ली मुंबईला हरवणार का???
मंडळी दिल्ली daredevils संघाने आपलं नाव बदललंय. आता त्यांचं नाव झालं आहे दिल्ली कॅपिटलस. आता या नाव बदलाने दिल्लीचं भाग्य बदलणार का ते आपल्याला हा सिझन सांगेल. आजवर एकदाही ट्रॉफी न जिंकणाऱ्या दिल्लीचा सामना आहे तीन वेळा विजेता राहिलेल्या मुंबई सोबत. आजवर या दोन संघात २२ मॅचेस झाल्या आहेत आणि त्यात दोन्ही संघांनी ११ विजय मिळवले आहेत. म्हणजे त्याबाबतीत ते एकदम बरोबरीचे आहेत.
मुंबई इंडियन्स
तर, २०१८ हे वर्ष मुंबईच्या टीमसाठी फार वाईट होते. चांगली टीम असूनही त्यांचा खेळ फारसा चांगला होऊ शकला नाही. आज जेव्हा रोहित शर्माच्या लिडरशिप खाली हा संघ जेव्हा उतरेल, तेव्हा नक्कीच या वर्षी परत एकदा आपले नाव विजेता म्हणून कोरण्यास तयार असेल. मुंबईच्या टीममध्ये एकदम स्टार खेळाडू भरलेले आहेत. रोहितशिवाय पंड्या बंधूवर या संघाची मदार असेल. या वर्षी युवराज सिंगसुद्धा मुंबईकडून खेळणार आहे. मुंबईच्या बोलिंगची भिस्त भारताचा टॉप गोलंदाज बुमराहवर असणार आहे. त्याला साथ द्यायला मयंक मार्कंडेय हा स्पिनर असणार आहे.
दिल्ली कॅपिटलस
श्रेयस अय्यर कॅप्टन असणाऱ्या दिल्लीकडून बॅटिंगची जबाबदारी शिखर धवन, रिषभ पंत आणि पृथ्वी शॉ यांच्यावर असणार आहे. मुंबईच्या बोलिंगसमोर हे लोक काय करतात हे पाहण्यालायक असेल. शिखर धवनसाठी ही वर्ल्ड कप संघात जागा मिळवण्याची संधी आहे, तर दुखापतीतून बाहेर येणाऱ्या पृथ्वी शॉकडून खूप अपेक्षा आहेत.
हा सामानासुद्धा तुम्ही स्टार नेटवर्कवर मराठीतून पाहू शकता.