या आहेत किंग कोहलीच्या कारकिर्दीतील टॉप ५ टेस्ट बेस्ट इनिंग; यापैकी तुमची आवडती इनिंग कुठली?
सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला हवी तशी कामगिरी करता आली नाही. तो स्वस्तात माघारी परतला. मात्र येणाऱ्या सामन्यांमध्ये तो मोठी खेळी करू शकतो. दरम्यान बोभाटाच्या या लेखात आम्ही तुम्हाला विराट कोहलीच्या टॉप -५ इनिंगबद्दल माहिती देणार आहोत.
१) ऑस्ट्रेलियाविरुध्द १४१ धावा..
विराट कोहली जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध फलंदाजी करण्यासाठी उतरतो, तेव्हा तेव्हा विराटची बॅट तळपते. २०१४ मध्ये जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. त्यावेळी देखील विराटने तुफान फटकेबाजी केली होती. त्याने मालिकेतील पहिल्याच सामन्यात १४१ धावा ठोकल्या होत्त्या.
२) दक्षिण आफ्रिकेविरुध्द ११९ धावांची खेळी..
दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यात देखील विराट कोहली माहीर आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. २०१३ मध्ये झालेल्या जोहान्सबर्ग कसोटीत देखील विराटचे रौद्ररूप पाहायला मिळाले होते. त्याने या सामन्यात ११९ धावांची तुफानी खेळी केली होती.
३) ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध १६९ धावांची खेळी..
ऑस्ट्रेलियाविरुध्द २०१४ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत त्याने १६९ धावांची तुफानी खेळी केली होती. त्यावेळी विराट कोहली चांगल्याच फॉर्ममध्ये होता. यावेळी देखील अशी आशा व्यक्त केली जात आहे की, विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुध्द सुरू असलेल्या मालिकेत धावांचा पाऊस पाडेल.
४) इंग्लंडविरुध्द १४९ धावांची खेळी..
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा इंग्लंडच्या स्विंग करणाऱ्या गोलंदाजांना देखील सहजरित्या खेळून काढतो. इंग्लंडचे गोलंदाज आपल्या स्विंग गोलंदाजीसाठी ओळखले जातात, मात्र विराट समोर हे गोलंदाज देखील गुडघे टेकताना दिसून येतात. कोहलीने २०१८ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत अप्रतिम फलंदाजी करत १४९ धावा केल्या होत्या.
५) दक्षिण आफ्रिकेविरुध्द १५३ धावांची खेळी..
दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज हे विराट कोहलीला घाबरतात. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे विराटची आक्रमक फलंदाजी शैली. दक्षिण आफ्रिकेविरुध्द झालेल्या अनेक सामन्यांमध्ये विराट कोहलीने अप्रतिम खेळी करत भारताला विजय मिळवून दिला आहे. २०१८ मध्ये झालेल्या मालिकेत विराटने १५३ धावांची खेळी केली होती.