3 Stars on Team India Jersey: भारतीय संघाच्या जर्सीवर ३ स्टार्स का? जाणून घ्या कारण..
तुम्ही भारतीय क्रिकेट संघाचे फॅन असाल तर तुम्ही भारतीय संघाची निळ्या रंगाची जर्सी नक्कीच पाहिली असेल. अनेकदा या जर्सीचा रंग बदलला जातो, पॅटर्न बदलला जातो. मात्र तुम्ही खरंच ही जर्सी निरखून पाहिली आहे का? जर नसेल पाहिली तर आज नक्की पाहा.
भारतीय पुरुष संघाच्या जर्सीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचा लोगो आहे. या लोगोच्या खाली ३ स्टार्स असतात. मात्र हे ३ स्टार्स असण्यामागचं कारण काय? जाणून घ्या.
या कारणामुळे असतात ३ स्टार्स...
या स्टार्स बद्दल बोलायचं झालं तर हे स्टार्स जर्सी चांगली दिसावी म्हणून लावले जात नाहीत. तर या स्टार्सला विशेष महत्व आहे. हे स्टार्स जर्सीची शोभा वाढवतात. हे स्टार्स ऐतिहासिक विजयांची ग्वाही देतात. या ३ स्टार्सचा अर्थ म्हणजे भारतीय संघाने ३ वेळेस वर्ल्डकप स्पर्धेत विजय मिळवला आहे.
जर्सीवर ३ स्टार्स का?
तुम्हाला माहित असेल की, भारतीय संघाने क्रिकेटच्या इतिहासात ३ वेळेस वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली आहे. २ वेळेस वनडे वर्ल्ड कप तर १ वेळेस टी -२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने विजय मिळवला आहे.
या संघाच्या जर्सीवर आहेत सर्वाधिक स्टार्स..
जर तुम्ही नीट पाहिलं तर ऑस्ट्रेलियाच्या जर्सीवर ६ स्टार्स आहेत. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक वेळेस विजय मिळवण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाच्या नावे आहे. ऑस्ट्रेलिया संघाने ५ वेळेस वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत तर १ वेळेस टी -२० वर्ल्ड कप स्पर्धेत विजय मिळवला आहे.