Success Story Of RInku Singh: सफाई कामगार ते KKR चा सुपरस्टार! वाचा रिंकू सिंगचा प्रवास..
सध्या भारतात आयपीएल २०२३ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. रविवारी गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पहायला मिळाला. या सामन्यातील शेवटच्या षटकात २८ धावांची गरज असताना रिंकू सिंगने सलग ५ षटकार मारून कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला. कोण आहे कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून देणारा रिंकू सिंग? वाचा.
रिंकू सिंगच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर, ५ भावंडांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे वडील गॅस सिलेंडर घरोघरी पोहचवण्याचे काम करायचे. तर एक भाऊ ऑटो रिक्षा चालवायचा आणि दुसरा भाऊ कोचिंग सेंटरमध्ये नोकरी करायचा. तसेच रिंकू सिंगच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर, तो नववीला असताना नापास झाला होता. शिक्षण कमी असल्यामुळे त्याला चांगली नोकरी मिळत नव्हती. खूप प्रयत्न केल्यानंतर त्याच्या भावाने त्याला नोकरी मिळवून दिली. परंतु शिक्षण कमी असल्यामुळे त्याला झाडू मारण्याची नोकरी मिळाली होती.
या कठीण काळात देखील त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रित करून ठेवलं होतं. २०१५ मध्ये एकवेळ अशी आली होती, ज्यावेळी त्याच्या कुटुंबावर ५ लाखांच कर्ज भरण्याची वेळ आली होती. युपीच्या १९ वर्षाखालील संघातून खेळताना त्याला भत्ता मिळायचा. याच पैशातून त्याने कर्ज फेडले होते. २०१७ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याला पंजाब संघाने १० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. २०१८ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला ८० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले. तसेच या हंगामात त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने ५५ लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. आतापर्यंत तो आपल्या क्षेत्ररक्षणामुळे चर्चेत आला होता. सध्या तो फलंदाजीमुळे चर्चेत आला आ हे