एकेकाळी आत्महत्या करायला निघालेली ते आता ऑलिंपिक पदक प्राप्त करणारी रावेन साँडर्स!!
ऑलिम्पिकमध्ये देशविदेशातील अनेक खेळाडू आणि त्यांची विविध रूपे पाहायला मिळत असतात. रावेन साँडर्स ही गोळाफेकमधील अमेरिकन खेळाडू तिच्या भन्नाट लूक्समुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
रंगीबेरंगी केस करून फिरणे तसे काही नविन नाही. मात्र ही रावेन साँडर्स चेहऱ्याला विचित्र मास्क लावून खेळत असते. तिचा मास्क बॅटमॅन सिनेमातील जोकरची आठवण् करून देत असतो. जो बघेल तो घाबरून जाईल इतके भयानक तिचे मास्क असतात.
तिची स्टाईल जरी विचित्र वाटत असली तरी तिचा प्रवास मात्र प्रेरक आहे. यावर्षी तिने गोळाफेक खेळात आपले पहिले ऑलिम्पिक पदक प्राप्त केले. रौप्यपदक जिंकलेली रावेन एकेकाळी आत्महत्या करायला निघाली होती.
२५ वर्षांची रावेन आपल्या मजबूत अंगकाठीमुळे 'द हल्क' या नावाने ओळखली जाते असते. सातत्याने येत असलेल्या अपयशाला कंटाळून तिने आत्महत्येचा निर्णय घेतला होता. तिच्या जवळच्या लोकांनी थेरपिस्टकडे नेल्यावर ती गंभीर डिप्रेशनमधून जात असल्याचे समजले.
अशा कालखंडातुन बाहेर पडत तिने शेवटी ऑलिम्पिक पदकाला गवसणी घातली आहे. आज तिच्या स्टाईलची आणि तिच्या विचित्र मास्कची चर्चा असली तरी तिचा प्रवाससुद्धा तितकाच रंजक आहे.