भल्लालदेवाचा ह्यो भयानक रथ नेमका चालतोय तरी कशावर ?
बाहुबली.. बाहुबली.. आणि परत बाहुबली. असला जबराट शिनेमा बघून दुसरं सुचतंय तरी काय राव? बघंल तिथं तीच चर्चा. कसा बनवला, किती खर्च झाला, किती कमावले... प्रत्येक गोष्ट आश्चर्य करायला लावणारी. आता अजून थोडी माहिती घ्या. त्या भल्लालदेवाच्या रथाबद्दल.
बाहुबलीच्या पहिल्या भागात या भल्लालदेवाच्या रथाने एकदम खतरनाक एन्ट्री मारून हवा केली होती. रथाच्या तोंडाला फिरणारी धारदार पाती, आडवा येईल त्याचे तुकडे तुकडे उडवत वेगाने पुढे सरकणारा हा रथ बाहुबलीच्या दुसऱ्या भागातही दिसतोय. कसा बरं पळतो हा रथ? कशी फिरतात ही पाती? त्या रथ ओढणार्या रेड्यांमुळे? मुळीच नाही. मंडळी, या रथाला चक्क रॉयल एनफील्डचं इंजिन जोडण्यात आलंय!!
आता रॉयल एनफील्डचं इंजिन म्हणजे एकदम पॉवरबाज गोष्ट. हा असला भयानक रथ चालवण्यासाठी तेवढीच मोठी पॉवर लागणार. बाहुबलीचे प्रॉडक्शन डिझायनर साबू सिरिल यांनी हा खुलासा केलाय. ते रथाला बांधलेले सांड तर फक्त देखाव्याला आहेत मंडळी. हा रथ पळवण्यासाठी एक ड्रायव्हर होता. ज्याच्या हातात या रथाचं स्टिअरिंग होतं.
तर काय? प्रत्येक गोष्टीत एवढी मेहनत! उगाचच पाच वर्षे नाही लागली बनवायला!!
पुढे वाचा :
बाहुबली आणि लायन किंग : दोन्ही चित्रपटातील साम्य तुम्ही हेरलं का?
आता लोकप्रिय होतीय 'बाहुबली साडी' : चित्रपटाची स्त्रियांवरही जादू..
भल्लालदेवला एका डोळ्याने दिसत नाही...वाचा काय म्हणाला राणा दग्गुबाती!!!