computer

बॉलीवूडच्या खलनायकांची मुले काय करतात ?

जगात काहीही चालू असलं तरी लोकांना एंटरटेनमेंट तर लागतेच. आणि भारतात एंटरटेनमेंट म्हणजे बॉलिवूड हे समीकरण ठरलेलं आहे. या इंडस्ट्रीचा भारतावरील करिष्मा गेली कित्येक दशके कमी झालेला नाही. बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक वर्षांत कित्येक तारे चमकून गेले. व्हिलन म्हणून किंवा हिरो म्हणून या लोकांनी कारकीर्द गाजवली. मात्र बॉलिवूडमध्ये माणूस एकदाचा सेटल झाला म्हणजे तो एकटा सेटल होत नाही. सोबतीला तो आपल्या नातलगांना पण सेट करतो. मात्र काही स्टार्सनी बॉलिवूडमध्ये हिट सिनेमे देऊनसुद्धा आपल्या मुलांना बॉलिवूडमध्ये आणले नाही. पाहूयात कोण आहेत हे!!

गुलशन ग्रोव्हर

बॉलिवूडचा बॅडमॅन गुलशन ग्रोव्हर म्हणजे ९० च्या दशकात व्हिलन म्हणून पर्मनंट होता. हिरो आणि हिरोईन यांच्या मधला सर्वात मोठा अडथळा म्हणजे गुलशन ग्रोव्हर हेच चित्र त्याचे होते. सध्या गुलशन ग्रोव्हर बॉलिवूडमध्ये दिसत नाही. त्याचा मुलगा संजय देखील बॉलवुडमधून गायब असला तरी तो मेट्रो गोल्डविन मेयर, (हो, टॉम अँड जेरीवाला एमजीएम) आणि इतर इंटरनॅशनल स्टुडिओज सोबत काम करतो. स्पेशल सिनेमे डायरेक्ट करण्याचे काम त्याचे असते.

रणजित

हा भाऊ म्हणजे 'हवस का पुतळा' याच विशेषणाने ओळखला जात असे. एवढेच काय, बाहेर फिरताना लोक त्याच्याकडे त्याच नजरेने बघत असत. त्याने हाऊसफुल २ या सिनेमात काही वर्षांपूर्वी काम केले होते. रणजितचा मुलगा सध्या फॉर्म्युला वन कार रेसर आहे.

दिलीप ताहील

दिलीप ताहील हे आपल्या विविधांगी भूमिकांसाठी ओळखले जातात. व्हिलन, साईड व्हिलन अशा भूमिका त्यांनी अधिक केल्या आहेत. त्यांचा मुलगा ध्रुव हा सध्या मॉडेलिंग करतो. पण भावाने मॉडेलिंगसाठी बॉलिवूडऐवजी लंडन निवडले आहे आणि तिथेच स्थायिक झाले आहेत.

अमरीश पुरी

अमरीश पुरी म्हणजे आपल्या भूमिकांनी स्वतःला अमर करून गेलेले खलनायक आहेत. त्यांनी केलेल्या भूमिका आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. पण त्यांनी स्वतःच्या या लोकप्रियतेचा फायदा मुलांसाठी घेतला नाही. त्यांचा मुलगा राजीव पुरी एक बिजनेसमॅन आहेत, तर मुलगी कॉस्च्युम डिझायनर आहे. मुले जरी बॉलिवूडमध्ये आली नसली तरी त्यांचा नातू म्हणजेच राजीव पुरी यांचा मुलगा हर्षवर्धन हा यशराज फिल्ममध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतो.

कुलभूषण खरबंदा

बॉलीवूडचे शाकाल म्हणून जगभर ओळख असलेले कुलभूषण खरबंदा अजूनही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. नुकतीच आलेली सिरीज मिर्झापूरमध्येही ते दिसले होते. त्यांची मुलगी श्रुती मात्र बॉलीवूडपासून दूर राहून नवरा रोहित नवले या बिजनेसमॅनसोबत सुखी संसार करत आहेत.

तर या प्रमुख व्हिलन लोकांना सोडले तर इतर अनेक व्हिलनचा रोल करणारे अभिनेते एकतर आपल्या मुलांना बॉलीवूडमध्ये आणून सेट करत आहेत किंवा तसे प्रयत्न तरी सुरू आहेत

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required