गोरख शर्मा : आशिकी, एक दुजे के लिये, कर्ज या सिनेमांच्या गाण्यावर आपली जादू करणारा जादुगार !!

गोरख शर्मा हे नाव सहसा तरुण पिढीने किंवा जुन्या पिढीनेसुद्धा फारसं ऐकलं नसेल. गोरख शर्मा हे लक्ष्मीकांत प्यारेलाल या संगीतकार जोडीतल्या प्यारेलाल यांचे धाकटे बंधू. गोरख शर्मा म्हणजे ९० च्या दशकातला गिटारचा जादुगार. त्यांनी जवळजवळ ५०० सिनेमांमध्ये १००० पेक्षा जास्त गाण्यात गिटार वाजवली आहे. त्यांच्याबद्दल ओळख सांगायचीच झाली तर कर्ज, बॉबी, आशिकी (पहिला), एक दुजे के लिये, हम, या सारख्या सिनेमांमध्ये जी सुपरहिट गाणी होती त्यात गोरख शर्मा यांच्याच गिटारने जादू केली होती. भारतीय फिल्म इंडस्ट्री मधले पहिले ‘बेस गिटारीस्ट’ म्हणून त्यांना ओळखलं जातं.
अश्या या महान गिटारीस्टचं २६ जानेवारी, २०१८ रोजी निधन झालं. त्यांच्या आठवणीत आज बघूया त्यांच्या काही सुपरहिट गाण्यांची एक झलक.