हॅप्पी बर्थडे मुक्ता : वाचा मुक्ता बर्वेचा रंगीबेरंगी प्रवास

हॅप्पी बर्थडे मुक्ता : वाचा मुक्ता बर्वेचा रंगीबेरंगी प्रवास

मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची आणि लोकप्रिय तारका मुक्ता बर्वेचा आज वाढदिवस. चला जाणून घेऊया तिच्या आतापर्यंतच्या रुपेरी वाटचालीबद्दल...

 

▪ मुक्ताचा जन्म झाला 17 मे 1979 मध्ये पिंपरी चिंचवड येथे.. वडिल टेलिकॉम कंपनीमध्ये जॉब आणि आई शाळेत शिक्षिका म्हणून काम करायच्या.

 

▪ शालेय जीवनात मुक्ता अनेक नाटकात सहभागी व्हायची. आणि दहावीनंतर तिने अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं ठरवलं होतं. मुक्ताचा भाऊ सुद्धा एक व्यावसायिक कलाकार आहे.

 

▪ सावित्रीबाई फुले विद्यापीठतून मुक्ता 'थिएटर' या विषयात ग्रॅज्युएट झाली आहे आणि सोबतच 'ड्रामा' या विषयातून तिने बॅचलर डिग्री सुद्धा मिळवली आहे.

 

▪ आपल्या अभिनयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मुक्ता पुणे सोडून मुंबईमध्ये गर्ल्स हॉस्टेलला येऊन राहिली.

 

▪ 1999 मध्ये 'घडलंय बिघडलंय' या कार्यक्रमातून मुक्ताने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं. तिचं पहिलं नाटक होतं 'आम्हाला वेगळं व्हायचंय' आणि तिचा पहीला चित्रपट होता 2002 मध्ये प्रदर्शित झालेला 'चकवा' त्यासाठी तिला पदार्पणातच पुरस्कार मिळाला.

 

▪ थांग, सावर रे, माती माय, एक डाव धोबी पछाड, बदाम राणी गुलाम चोर, ऐका दाजीबा, हायवे, मंगलाष्टक वन्स मोअर, जोगवा, मुंबई पुणे मुंबई, मुंबई पुणे मुंबई - 2, डबल सिट असे एकापेक्षा एक सरस चित्रपट मुक्ताने दिले.

 

▪ घर तिघांचं असावं, देहभान, फायनल ड्राफ्ट,  छापा काटा, रंग नवा, इंदिरा इ. नाटकात मुक्ताने काम केलंय.. तसेच पिंपळ पान,  बंधन, बुवा आले, चित्त चोर, आभाळमाया, अग्निशिखा,  मधू इथे चंद्र तिथे अशा अनेक कलाकृतीतून ती छोट्या पडद्यावर दिसली.. सध्या कोडमंत्र नावाचं तिचं नाटक तुफान लोकप्रिय आहे..

 

▪ मुक्ताला तिच्या अभिनयासाठी अनेक नावाजलेले पुरस्कार मिळाले आहेत. पण 'जोगवा' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि मुक्ता खऱ्या अर्थाने  लोकप्रिय झाली. सतिश राजवाडे यांच्या 'मुंबई पुणे मुंबई' या चित्रपटातील मुक्ता आणि स्वप्निल जोशीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली.

 

▪ मुक्ताने महाराष्ट्र स्टेट फिल्म अॅवार्डचे उत्कृष्ट पदार्पणासाठी एक, आणी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून चार पुरस्कार जिंकले आहेत..आणि आजही मुक्ता प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची भुरळ पाडत आहे.

 

मुक्ताला वाढदिवस आणी तिच्या भावी कारकिर्दीसाठी बोभाटा.कॉम कडून हार्दिक शुभेच्छा.. 

सबस्क्राईब करा

* indicates required