मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

विमानच जेव्हा 40 प्रवासी विसरते..

1 मिनिट वाचन
शेअर करा:
विमानच जेव्हा 40 प्रवासी विसरते..

तुम्ही कधी विमान प्रवाशांना विमानतळावरच विसरून गेल्याचे ऐकले आहे का? नाही ना? मग ही बातमी वाचून तुमचे चांगलेच मनोरंजन होईल. 

स्पाईसजेटचे कोची ते मुंबईहून जाणारे विमान एक दोन नव्हे, तर चक्क 40 लोकांना जमिनीवर सोडून निघून गेले होते. या घटनेमुळे लोक नक्कीच बुचकाळ्यात पडले होते. 


हे विमान मुंबईमध्ये असलेल्या ट्राफिक कंजेशनमुळे आधीच 75 मिनिटे लेट होते. त्यात कोची विमानतळावर जोराचा पाऊस चालू होता. प्रवाशांना टर्मिनलवरून बसने विमानाकडे नेण्यात येत होते. शेवटचे 40 प्रवासी पावसामुळे बसमध्ये अडकून पडले होते. या प्रवाशांना अचानक त्यांचे विमान टेक ऑफ करताना दिसले. एअर ट्राफिक कंट्रोलला विमानाशी संपर्क करून विमान परत वळवायला लागले. या सगळ्या गदारोळानंतर 20 मिनिटाने विमान निघाले.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

तिकीट नाही, पासपोर्ट नाही, तरी विमानाने गाठलं न्यूयॉर्क; दोन पोरांचे अजब साहस!
लाइफस्टाइल

तिकीट नाही, पासपोर्ट नाही, तरी विमानाने गाठलं न्यूयॉर्क; दोन पोरांचे अजब साहस!

१९८५ मध्ये डब्लिनच्या दोन लहान मुलांनी तिकीट आणि पासपोर्ट नसताना लंडनहून न्यूयॉर्कपर्यंत एअर इंडियाच्या विमानातून केलेला अविश्वसनीय प्रवास.

२१ ऑगस्ट, २०२६

अडीच मिनिटांत विमान अपहरणाचा थरार संपवणारा पायलट: उरी बार-लेव्ह
लाइफस्टाइल

अडीच मिनिटांत विमान अपहरणाचा थरार संपवणारा पायलट: उरी बार-लेव्ह

एका धाडसी पायलटच्या प्रसंगावधानामुळे आकाशातच हायजॅकर्सचा डाव उलथवून लावणारी एल अल फ्लाईट २१९ ची थरारक कथा.

१८ ऑगस्ट, २०२६

एका मासिकातून दरमहा ३ कोटींची कमाई: इंडिगोचे एक अजब बिझनेस मॉडेल
लाइफस्टाइल

एका मासिकातून दरमहा ३ कोटींची कमाई: इंडिगोचे एक अजब बिझनेस मॉडेल

विमानात ठेवल्या जाणाऱ्या 'हॅलो ६ई' मासिकातून इंडिगो एअरलाइन्स दरमहा ३ कोटी रुपये जाहिरातींतून कशी कमावते, याचे रंजक गणित.

१५ जून, २०२६