माधुरीच्या वाढदिवसानिमित्त वाचा तिच्याबद्दल घडलेला भारत-पाक युद्धावेळचा किस्सा !!
आज धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा वाढदिवस. माधुरी बॉलीवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची सुंदरता, मोहकता आणि घायाळ करणारी ‘स्माईल’ प्रत्येकालाच ‘खलास’ करून जाते. यापासून चक्क पाकिस्तान सुद्धा वाचलेला नाही राव.
आज माधुरीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या लोकप्रियतेचा एक किस्सा वाचूया जो ऐन कारगिलच्या युद्धात घडला होता.
राव, माधुरीने तिच्या मोहक अदांनी एक काळ गाजवला होता. भारतात जशी ती प्रसिद्द होती तशीच ती पाकिस्तानात देखील प्रसिद्ध होती. त्यावेळी भारत-पाकिस्तान दरम्यान कारगिल युद्ध सुरु होतं. याच युद्धातला हा किस्सा आहे. युद्धाच्यावेळी पाकिस्तानकडून भारताला खिजवण्यासाठी टोमणा मारण्यात आला. त्यांनी मागणी केली, “तुम्ही आम्हाला माधुरी द्या, आम्ही काश्मीर सोडून देऊ...”
असं म्हणतात भारतीय जवानाने उत्तरादाखल टोमणा मारणाऱ्याला गोळ्या घातल्या होत्या. राव, त्या पाकिस्तानी सैनिकाला या उत्तराची अपेक्षाही नसेल.
मंडळीं, आजच्या काळात हा किस्सा हास्यास्पद वाटू शकतो पण हा किस्सा त्याकाळात गाजला होता. युद्धाच्या प्रसंगात अशा गोष्टी मिडीयाने मिर्च मसाला लावून चर्चेत आणल्या होत्या.
आज माधुरी मराठीत पाहिलं पाऊल ठेवत आहे. तिच्या चित्रपटाचं नाव आहे बकेट लिस्ट. या चित्रपटातील तिचा लुक बघितल्यावर तीच जुनी माधुरी आठवल्याशिवाय राहणार नाही. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या या नव्या चित्रपटाचा ट्रेलर बघून घ्या.
आपल्या मराठमोळ्या माधुरीला बोभाटा तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!