computer

या ९ सिनेकलाकारांनी बॉलीवूडमध्ये नाव मोठं करण्यासाठी नावच बदललं !!

बॉलीवूडमध्ये नाव मोठं करायला आधी नाव बदलण्याची गरज पडते. फार पूर्वी जवळजवळ प्रत्येक हिरोचं नाव कुमारने संपायचं. आजही अक्षय कुमार नावाचा गडी अस्तित्वात आहेच. नाव बदलल्याने फिल्म्स हिट व्हायच्या का हा वेगळा प्रश्न, पण सिनेमासृष्टीत चमकायचं असेल तर नावही तसंच असायला हवं हा जुना प्रघात आहे. सध्या त्याच्या पुढचा ट्रेंड आलाय. अभिनेते/अभिनेत्र्या नावाचं स्पेलिंग बदलतात. उदाहरणार्थ, अजय देवगण याने आपल्या नावाचं स्पेलिंग Ajay Devgan वरून Ajay Devgn केलं. अशा सिनेतारकांची यादी आम्ही तुम्हाला गेल्यावर्षी दिली होती.

आजच्या लेखात पाहूया असे सिनेकलाकार ज्यांनी चित्रपट सृष्टीत येण्यासाठी संपूर्णपणे नवीन नाव स्वीकारलं !!

१. जितेंद्र : रवी कपूर

२. अजय देवगण : विशाल विरू देवगण

३. कियारा अडवाणी : आलिया अडवाणी

४. अक्षय कुमार : राजीव ओम भाटीया

५. मिथुन चक्रवर्ती : गौरांग चक्रबोर्ती

६. जॅकी श्रॉफ : जयकिशन काकू भाई

७. मधुबाला : मुमताज जहां बेगम देहलावी.

८. देव आनंद : धरम देव पिशोरिमल आनंद

९. संजीव कुमार : हरिहर जेठालाल जरीवाल

१०. गुरुदत्त : वसंत कुमार शिवशंकर पदुकोण

११. राजेश खन्ना : जतीन खन्ना

१२. रेखा : भानुरेखा गणेशन

१३. रजनीकांत : शिवाजीराव गायकवाड

१४. दिलीप कुमार : युसुफ खान

सबस्क्राईब करा

* indicates required