सिनेमामध्ये हिरो-हिरॉईनने घातलेल्या कपड्यांचं नंतर काय होतं भाऊ? इथे वाचा...

बॉलीवूड म्हणजे तमाम भारतीयांच्या जीवनशैलीचाच एक भाग बनलाय मंडळी. इथे हिरो-हिरॉईनच्या चालण्या-बोलण्याच्या स्टाईलपासून  वेशभूषा आणि हेअर स्टाईलपर्यँत सगळं काही लोकं कॉपी करत असतात. सिनेमामध्ये हिरो-हिरॉईनने घातलेले कपडे तर लोकांच्यासाठी एक फॅशन ट्रेंडच बनत असतो. पण एकदा सिनेमामध्ये दिसलेले हे आकर्षक कपडे नंतर कधीच त्या हिरो-हिरॉईनच्या अंगावर दिसत नाहीत. काय होतं त्यांचं? कुठे जातात ते कपडे? या जाणून घेऊया...

कधी कधी काही स्पेशली डिझाईनड् कॉश्च्युम्स भलतेच लोकप्रिय होतात. नायक किंवा नायिकेचं ते पात्र लोकांच्या खास पसंतीस उतरतं. अशावेळी त्या कपड्यांचा लिलाव केला जातो. आणि लिलावातून मिळालेले पैसे हे चॅरीटीसाठी वापरले जातात. आपल्या आवडत्या हिरो-हिरॉईनने घातलेले हे कपडे खरेदी करण्यासाठी चाहतेही हवा तेवढा पैसा ओतायला तयार असतात. आठवतंय ना ? देवदासमध्ये माधुरीने परिधान केलेला लेहंगा एका चाहत्याने चक्कं ३ कोटी रुपये देऊन खरेदी केला होता!

स्त्रोत

कधी कधी हे कपडे खुद्द त्या फिल्म स्टार्सनाच भुरळ पाडतात. त्यामुळं निर्मात्यांच्या परवानगीनं हे कपडे ते स्वतःसाठीच घेऊन जातात. पण ते त्यांना परिधान करता येत नाहीत. ते फक्त आठवण म्हणून जपून ठेवण्यासाठी असतात. मनिष मल्होत्रा, अंजू मोदी सारखे काही बडे डिझायनर्स मात्र आपण डिझाईन केलेले कपडे स्वतःकडे परत घेतात.

स्त्रोत

काही प्रोडक्शन हाऊसेसकडून अशा लोकप्रिय पात्रांच्या कपड्यांना पेटीत बंद करून ठेवलं जातं. त्या पेटीवर त्या त्या चित्रपटाचं नाव लिहिलेलं असतं. हे कपडे त्या चित्रपटाची एक आठवण म्हणून जपली जातात. आणि काहीवेळा या कपड्यांचं दुसर्‍या कपड्यांसोबत नवीन मॅचिंग करून एक वेगळं कॉम्बिनेशन तयार केलं जातं. आणि मग हे कपडे दुसर्‍या चित्रपटात ज्युनियर आर्टिस्ट्सच्या अंगावर पाहायला मिळतात.

समजलं ना मंडळी ? मग माहिती आवडली तर शेअर करायला विसरू नका !!

सबस्क्राईब करा

* indicates required