जाणून घ्या... मराठमोळ्या मुलीला डेट करायचे १० उत्तम फायदे!!!
एखाद्या मराठी मुलीला डेट करण्याचे खूप काही फायदे असतात. मराठी मुलगी ही सोज्वळ, प्रामाणिक आणि संस्कारी असली तरी ती तेवढीच चपळ , तरबेज आणि स्मार्ट असते यात काही शंकाच नाही. मराठी मुलगी ही दुधारी तलवार असते हेच खरं. तुम्ही जर एखाद्या मराठमोळ्या मुलीला डेट करत नसाल, तर तुम्ही आयुष्यात खूप काही मिस करताय असचं म्हणावं लागेल!
का म्हणून विचारत असाल, तर हे आहेत तुमच्या पुढ्यात मराठी मुलीला डेट करायचे १० गमतीशीर फायदे....
१) गावातला बेस्ट वडापाव आणि पाणीपुरीचा गाडा तिला नक्कीच माहित असतो !
तिलाच बेस्ट फूड कुठे मिळतं हे माहित असल्यानं तुम्हाला ती ठिकाणं शोधत बसायचे कष्ट घ्यावे लागत नाहीत. तसेच पिझ्झासारख्या महागड्या पदार्थांवर पैसे खर्च करायची वेळ क्वचितच येते. इतर वेळी वडापाव किंवा पाणीपुरीवरसुद्धा स्वारी खुश असते . मराठी मुली देसी असल्याचा हा अतिउत्तम असा फायदाच म्हणा की !
२) वस्तूंचा भाव करण्यात त्या तरबेज असतात !
स्वतः कमवत्या असल्याने मराठी मुलींना पैश्यांची किंमत असते . पैसे जपून कसे वापरायचे ह्याचं जणू त्यांना ट्रेनिंग मिळालेलं असतं . त्यांना वस्तूंचा भाव करण्याची कला जन्मापासूनच अवगत आहे की काय असं वाटायला लागतं आणि त्यामुळे तुमचे पैसेही वाचतात आणि उगाच खिश्याला कात्रीही बसत नाही हे विशेष!
३) मराठी मुली पारंपारिक वेशभूषेत विशेष सुंदर दिसतात !
एखादी मराठी मुलगी जेव्हा नऊवारी साडी नेसून येते तेव्हा तिच्या त्या पारंपारिक पेहरावाने ती आणखीनच खुलून येते. फक्त नऊवारी साडीच नव्हे तर इतर कुठल्याही भारतीय वेशभूषेत ती उठूनच दिसते ... जेवढी ती नऊवारीत तेवढीच ती लेहंगा चोळी तसेच पंजाबी ड्रेस मधेही छानच दिसते.
४) ती स्वतःच एक लेडी 'दबंग' असते !
एका मराठी मुली बरोबर वावरताना तुम्हाला कोणत्याही परीस्थितीत घाबरून जायची काही गरज नाही. कारण ती स्वतःच एक लेडी दबंग असते . ती स्वतःच स्वत:चं रक्षण करण्यास तत्पर असते . तिच्यासोबत असताना कोणीही तुमच्या केसालाही धक्का लाऊ शकत नाही इ,तकी ती धडाकेबाज आणि बिनधास्त असते.
५) रस्ते का माल सस्तेमे असं जरी असलं तरी तिला रस्त्यावरची शॉपिंग आवडते !
स्ट्रीट शॉपिंग म्हणजे स्वस्त आणि मस्त! आहे त्या व तितक्याच बजेटमध्ये चांगलं दिसण्याचा प्रयत्न त्या करतात. मॅाल मधील ब्रंडेड वस्तूंचा त्यांना हव्यास नसतो.
६) त्या उत्तम स्वयंपाक करतात ...त्या सुगरण असतात !
"दिल का रास्ता पेट से हो कर निकलता है" असं म्हणतात आणि हे खरं असेल तर मराठी मुलगी कोणाचंही मन जिंकू शकेल. कारण स्वयंपाक हा तिला लहानपणापासूनच शिकवला जातो . काही तर त्यात खुपच हुशार असतात...
7) मराठमोळ्या मुली 'गणपती डान्स 'करण्यात माहीर असतात !
कोणत्याही डान्स क्लासशिवाय , प्रॅक्टिसशिवाय मराठी मुली अगदी बिनधास्त नाचतात . मनमोकळेपणाने नाचणं तर कोणी मराठी मुलींकडून शिकावं. त्यांच्या हावभावातच त्यांचं कौशल्य दडलेलं असतं.
8)मराठी मुलींना पारंपारिक सणांचीसुद्धा ओढ असते !
एखादी मुलगी बोल्ड आणि मॉडेल असूनही संस्कारी असेल तर अजून काय हवं? मराठी मुलगी ही फक्त आजची फॅशन मिरवत नाही तर ती जुन्या सणांचीसुद्धा जोपासना करते.
9) सुरुवातीला वाटते लाजाळू, पण असते सॉल्लीड ढासू !!!
मराठी मुलगी ही सुरुवातीला लाजाळू वाटते... पटकन ती बोलत नाही एकदा जर ती सुरु झाली तर मग तिला कोणी अडवू शकत नाही. दिसायला जरी शांत वाटली तरी दिसतं तसं नसतं हेच खरं!!!
10) बॉलीवूडची दिवाणी लावेल तुम्हालाही वेड !!!
मराठीमुलीच्या नसानसांत बॉलीवूड भिनलेलं असतं. ती तुम्हाला नेहमी ती हसत ठेवेल आणि मग तुम्हालाही बॉलीवूडचं वेड लागेल एवढं नक्की !
तर एवढी सगळी माहिती मिळाल्यानंतर कधी शोधताय मग मराठी मुलगी?
लेखिका : संयुक्ता पेनुरकर