बाहुबली आणि लायन किंग : दोन्ही चित्रपटातील साम्य तुम्ही हेरलं का?
बाहुबली म्हणजे भारतीय सिनेमासृष्टीची एक भव्य आणि तितकीच असामान्य कलाकृती. इथं बाहुबलीच्या गुणवत्तेबाबत कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. पण इंटरनेट जगतात चर्चा रंगलीय ती बाहुबली आणि लायन किंग या दोन चित्रपटांमधील साम्याची. हो मंडळी, हॉलीवूडचा लोकप्रिय अनिमेशनपट लायन किंग आणि आपला बाहुबली या दोन्हींमध्ये बरीच समानता दिसतेय. बघा तरी...
भल्लालदेव आणि स्कार या दोन्ही खलनायकी पात्रांच्या उजव्या डोळ्यावर एकाच पध्दतीचा व्रण दिसतो.
दोन्ही चित्रपटात एकाच स्टाईलने बाळाला वर उचलून जनतेला सांगितलं जातं, की हाच तुमचा भविष्यातील राजा आहे.
लायन किंगमध्ये स्कार आपल्या भावाला मारून त्याची बायको साराबी हिला बंदिवासात टाकतो. बाहुबली मध्ये भल्लालदेवही बाहुबलीला मारल्यानंतर देवसेनेला बंदी बनवतो.
सिम्बा आणि शिवा, दोन्ही पात्रं राजघराण्यातील आहेत. पण दोघांनाही बाहेरच्या लोकांकडून वाढवलं जातं.
लायन किंगमध्ये ज्याप्रमाणे सिम्बा आणि नाला यांच्यात भांडणातून प्रेमाची सुरूवात होते, त्याचप्रमाणे बाहुबली मध्ये शिवा आणि अवंतिका हे दोघेही भांडणातूनच प्रेमाची सुरुवात करतात.
आणि शेवटचं साम्य म्हणजे दोन्ही चित्रपटात पांढर्या दाढीचा हुशार मदतनीस आहे.
काय भाऊ, पेटली का ट्युब ? पण कितीही साम्य असलं तरी दोन्ही सिनेमे आपापल्या जागी सर्वोत्कृष्ट आहेत हे मात्र खरं. तसा हा लायन किंग चित्रपटही शेक्सपियरच्या कादंबरीवर आधारलेला आहे बरं का...