१० मे १८५७, भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याला १६२ वर्षे पूर्ण!!
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/field/image/1857_0.jpg?itok=-CaIHgwZ)
कित्येक वर्षे आधीच खदखदत असलेल्या असंतोषाची १० मे १८५७रोजी मीरतच्या ब्रिटिश सैन्य छावणीत अखेर ठिणगी पडली आणि हिंदुस्तानचं स्वातंत्र्यसमर सुरू झाले. एक वर्ष, एक महिना, दोन आठवडे आणि पाच दिवस चाललेल्या या लढ्यात बंडखोरांना अपयश पत्करावे लागले तरी यातच पुढच्या युद्धाची बीजे पेरली गेली.
या उठावाचे प्रमुख नेतृत्व बादशाह बहादुर शाह जफ़र, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल, नानासाहेब पेशवे, लियाकत अली, तात्या टोपे, कुंवर सिंह, भक्त खान आणि खान बहादुर खान रोहिला यांनी केले. या उठावाची बीजे ८ एप्रिल रोजी मंगल पांडेंच्या बलिदानाने पेरली गेली व हळूहळू सर्व ठिकाणच्या सैनिकांनी बंड पुकारले. या सर्व नेत्यांचे आणि अनामिक शूरवीरांचे बलिदाल व्यर्थ गेले नाही.
या उठावानंतर मुघल आणि मराठा साम्राज्याचा अंत झाला आणि भारतातून कंपनी सरकारचा अंमल संपून ब्रिटिश राजघराण्याची सत्ता सुरू झाली.