बेअर ग्रिल्सबद्दल माहित नसलेल्या १२ गोष्टी !!!

एक माणूस डिस्कवरीवर नेहमी दिसतो. तो आपल्याला निर्जन जंगलातून, वाळवंटातून बाहेर कसं पडावं किंवा तिथे अडकल्यास जिवंत कसं वाचायचं हे शिकवतो. मग त्याचं ते प्राण्याचं कच्च मांस खाणं असो वा स्वतःचं मुत्र पिणं असेल. हे आपल्याला घाणेरडं जरी वाटत असलं तरी तो जे काही करतो ते पाहून लय भारी वाटतं. तसं आपणही एकदा कोणत्यातरी जंगलात, निर्मनुष्य जागी जावं असं आपल्यातल्या अनेकांना वाटत असेल. एव्हाना तुम्हाला लक्षात आलं असेलच की आम्ही कोणाबद्दल बोलतोय ते. मॅन व्हर्सेस वाईल्डमधला आपला हिरो आणि सर्व्हायव्हल एक्सपर्ट बेअर ग्रिल्स!!

बेअर ग्रिल्सनं केलेल्या थरारक गोष्टी आपल्याला माहित आहेत पण त्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल फार कमी माहिती आपल्याला असते. आज आम्ही तुमच्यासाठी याच भन्नाट माणसाच्या काही भन्नाट गोष्टी घेऊन आलो आहोत...

1. बेअर ग्रिल्सला २००६ ते २०११ पर्यंत चालेल्या ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ शोमुळे प्रसिद्धी मिळाली.

Image result for man vs wild

2. बेअर ग्रिल्सचं खरं नाव ‘एडवर्ड मायकल ग्रिल्स’ आहे.

Image result for bear grylls childhood

स्रोत

3. वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत बेअर उत्तर आयर्लंडमध्ये राहिला.

Image result for bear grylls child

स्रोत

4. बेअरला भारतीय सैन्यात सामील व्हायची इच्छा होती. पण भारतीय नागरिक नसलेल्या लोकांना भारतीय सैन्यात सामील होता येत नसल्यानं त्याचं स्वप्न अर्धवट राहिलं.

Image result for indian army

स्रोत

5. भारतीय सैन्यात जरी प्रवेश मिळाला नसला तरी बेअरला भारतीय सैन्याबरोबर काही काळ राहण्याची संधी मिळाली होती.

Related image

स्रोत

6. बेअर हा ‘शॉटोकॅन कराटे’ मध्ये सेकंड डॅन ब्लॅक बेल्ट आहे.

Image result for bear grylls dan black belt in Shotokan Karate

स्रोत

7. बेअरच्या नावावर एक आगळावेगळा विश्वविक्रम आहे. तो म्हणजे त्याने ७६०० मीटर उंचीवर एयर बलूनमध्ये बसून केलेला डिनर. एवढ्या उंचीवर अश्या प्रकारचा विक्रम आजपर्यंत कोणी केला नाहीये.

Image result for The Highest Open-Air Formal Dinner Party

8. सर्वात कमी वयात माउंट एवरेस्ट सर करणारा गिर्यारोहक म्हणून गिनीज वर्ल्ड रेकोर्ड मध्ये बेअरचं नाव कोरलं गेलं आहे. हा विक्रम त्याने १९९८ साली वयाच्या २३ व्या वर्षी केला. हा विक्रम करत असताना त्याचा पाठीचा कणा ३ जागी फ्रॅक्चर झाला होता.

Image result for bear grylls mount everest climb

स्रोत

9. बेअर ग्रिल्स शो करत असताना आणि वैयक्तिक आयुष्यातही अश्या काही जागी गेला आहे जिथे त्याच्या आधी कोणी माणूस पोहोचू शकलेला नाही.

Image result for bear grylls adventures

स्रोत

10. बेअरचं आपल्या परिवारावर इतकं प्रेम आहे की तो नेहमी शुटींगला जाण्याआधी आपल्या परिवाराचा एक फोटो आपल्या बुटात ठेवून निघतो.

Image result for bear grylls with family

स्रोत

11. ही गोष्ट खरी आहे कि त्याने मॅन व्हर्सेस वाईल्ड शोच्या दरम्यान कच्चे मांस आणि स्वतःचे मुत्र प्यायलं आहे. काही जणांना हे किळसवाणं वाटू शकतं, पण निर्जन जागी अडकल्यावर माणसासमोर दुसरा पर्याय नसतो हेच त्याला सुचवायचे असते.

Related image

स्रोत

12. बेअर आपल्याला नेहमी थरारक गोष्टी करताना दिसला आहे. परंतु त्याला गिटार आणि पियानो वाजवायलाही फार आवडतं.

स्रोत

 

आज बेअर बद्दल एवढ्या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचं कारणही खास आहे मंडळी. आज आपल्या या लय भारी बेअर ग्रिल्सचा वाढदिवस आहे राव. बोभाटा टीम तर्फे त्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

सबस्क्राईब करा

* indicates required