मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

अमानुषतेचा कळस : आंतर्जातीय विवाहाच्या रागात गर्भवतीला जिवंत जाळले !!!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
अमानुषतेचा कळस : आंतर्जातीय विवाहाच्या रागात गर्भवतीला जिवंत जाळले !!!

अनेक वर्षांपूर्वी आपण म्हणजे आज जे तरुण मुलांचे आईबाप आहेत त्यांनी 'एक दुजे के लिये' बघितला. त्या नतरच्या पिढीनं 'कयामत से कयामत तक' बघितला. आपल्या पिढीने ‘सैराट’ पाह्यला. मराठी सैराट कन्नडमध्ये पण आला. हे सर्व सिनेमे बघून बाहेर पडताना प्रेक्षकांचे डोळे पाण्याने डबडबले होते. पण हे सगळं काही तात्पुरतंच! पुढच्या काही तासांत आपण पुन्हा एकदा जात, धर्म आणि वंशाच्या दलदलीत पुन्हा फसत जातो. ही दलदल इतकी भयंकर आहे की वारंवार ‘सैराट’ घडतच राहातं. अशीच एक घटना घडलीय कर्नाटकातील विजयपुरात.

घटनेचं रूप साधारण सैराट सारखंच, फक्त इथे धर्माचा फरक आहे मंडळी. बानू बेगम या २१ वर्षाच्या ‘मुस्लीम’ मुलीला तिच्याच घरच्यांनी एका दलित मुलासोबत लग्न केल्याच्या रागावरून जिवंत जाळलंय. ती २ आठवड्यांपूर्वी ‘सायबाना कोन्नुर’ या तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यांनी लग्न देखील केलं होतं. मुलगा वाल्मिकी समाजातील (दलित) असल्यानं बानू बेगमच्या घरच्यांचा तिच्यावर प्रचंड राग होता.

एका आठवड्यापूर्वी ते आपल्या घरी जेव्हा परतले तेव्हा मुलीच्या घरच्यांनी तिला जिवंत जळलं. यात सायबाना कोन्नुर याला देखील जबर दुखापत झालीय. मुख्य बाब म्हणजे बानू बेगम ही मरतेवेळी गर्भवती होती. तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलासोबत तिला जिवंत जाळण्यात आलंय.

या घटनेला जबाबदार असलेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात तर घेतलं, पण खोट्या प्रतिष्ठेपाई बानू बेगम आणि तिच्या मुलाचा जीव गेला तो गेलाच.

शेवटी प्रश्न उरतोच :

आपण ‘सैराट’ बघून फक्त झिंगाट होऊन नाचलो की त्यातून काही शिकलो ?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा
लाइफस्टाइल

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा

फाळणीच्या विस्थापनानंतर ५ हजार रुपयांच्या बचतीवर जागतिक स्तरावर शाही एक्स्पोर्ट्सची निर्मिती करणाऱ्या महिला उद्योजक सरला आहुजा यांची प्रेरक गोष्ट.

२८ सप्टेंबर, २०२६

हिमालयाचा रशियन 'महर्षी': निळ्या रंगाच्या जादूनं डोंगर जिवंत करणारा निकोलाय रोरिक
लाइफस्टाइल

हिमालयाचा रशियन 'महर्षी': निळ्या रंगाच्या जादूनं डोंगर जिवंत करणारा निकोलाय रोरिक

हिमालयाच्या निळ्या रंगाने भुरळ पाडलेला रशियन चित्रकार निकोलाय रोरिक, ज्याने कुल्लू खोऱ्यात राहून हिमालयाचे गूढ कॅनव्हासवर उतरवले.

१६ जून, २०२६

जर तुम्ही गरोदर राहिला असतात तर? जाहिरात विश्वातला एक क्रांतीकारी संदेश!
लाइफस्टाइल

जर तुम्ही गरोदर राहिला असतात तर? जाहिरात विश्वातला एक क्रांतीकारी संदेश!

कुटुंब नियोजनाची जबाबदारी पुरुषांचीही आहे, हा संदेश देणाऱ्या जगातील एका सर्वात प्रभावी जाहिरातीचा इतिहास.

१ जून, २०२६

मदर्स डे: ज्या माऊलीने हा दिवस सुरू केला, तिनेच तो बंद करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं!
लाइफस्टाइल

मदर्स डे: ज्या माऊलीने हा दिवस सुरू केला, तिनेच तो बंद करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं!

मदर्स डेची सुरुवात करणाऱ्या ऍना जार्विस यांनी या दिवसाच्या व्यापारीकरणाविरुद्ध दिलेला लढा आणि त्यामागचा अस्वस्थ करणारा इतिहास.

१० मे, २०२६