हा माणूस कुत्र्याचं आयुष्य का जगत आहे ?? काय आहे हा विचित्र प्रकार ??
मंडळी, काहींना स्वतःबद्दल खूप गैरसमज झालेला असतो. जसे की आपल्याकडचे बाबा लोक स्वतःला देवाचा अवतार म्हणतात, सिनेमातल्या हिरो सारखी स्टाईल करून काही तरुण स्वतःला हिरो समजतात, टिकटॉक व्हिडीओ बनवणारे स्वतःला अभिनेते समजतात, मॅगी बनवणारे स्वतःला शेफ समजतात, शक्तिमानचं क्रेज आलं होतं तेव्हा मुलं स्वतःला शक्तिमान समजत होती. असे बरेच नमुने आपल्याला भेटत असतात. आज आपण अशाच एका नमुन्याला भेटणार आहोत, पण याची केस थोडी विचित्र आहे भाऊ.
या व्यक्तीचं नाव आहे काझ जेम्स. त्याचं वय आहे ३७ वर्ष. तो स्वतःला “ह्युमन पप” म्हणतो. हा काय प्रकार आहे ते आपण पुढे जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी या व्यक्तीला भेटूया
काझ जेम्स म्हणतो की “मला लहानपणापासून मी एक मनुष्य आहे हे कधी जाणवलंच नाही. मी स्वतःला कुत्रा समजत आलोय.” त्याला याचा पूर्ण साक्षात्कार १७-१८ व्या वर्षात झाला. त्यानंतर तो ऑनलाईन अशा व्यक्तींना भेटला ज्यांचे विचार त्याच्या सारखेच आहेत. मग त्याने कुत्र्याचं जीवनच जगायला सुरुवात केली.
मंडळी, काझकडे १.८ लाखाचा कुत्र्याचा सूट आहे. हे कपडे घालून तो कुत्र्याचं आयुष्य जगतो. हे इथेच थांबलेलं नाही तर तो भुंकतो, चावतो आणि कुत्र्यांप्रमाणेच खातो पण. तो पूर्णपणे ह्युमन पप बनला आहे.
ह्युमन पप म्हणजे काय ?
ह्युमन पप म्हणजे मानवी रूपातला कुत्रा. हा प्रकार अॅनिमल रोल प्ले मधला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जावर याला लैंगिक खेळ म्हणून बघितलं जातं, पण प्रत्येक वेळी हे लैंगिक क्रियेला धरूनच असेल असं नाही. काहीजण स्वतः मधल्या पशुरुपाला बाहेर काढण्यासाठी असा प्रयोग करतात. या खेळत एकजण कुत्रा बनतो तर दुसरा त्याचा “मास्टर”. या रोल प्ले मध्ये कुत्र्यांप्रमाणे कपडे आणि त्यांचे हावभाव केले जातात. अशाच प्रकारे इतर प्राण्यांचे रोल प्ले केले जातात. कधीकधी तर हे फक्त घरापुरतं मर्यादित नसतं राव. काहीजण असे पब्लिकमध्ये पण वावरतात.
मंडळी, आपल्याला हा प्रकार विचित्र वाटू शकतो, पण काही देशांमध्ये Animal roleplay महोत्सव भारावले जातात. या महोत्सवात रस्तोरस्ती गुढग्यांवर चालणारे, गळ्यात पट्टा अडकवलेली, नग्न माणसं दिसतात.
काझच्या केस मध्ये हा प्रकार लैंगिक खेळात किंवा मज्जा म्हणून केलेला प्रकारात मोडत नाही. काझ मानसिकरीत्या स्वतःला कुत्रा समजत आहे. त्याला जेव्हा ऑनलाईन Animal roleplay ची माहिती मिळाली तेव्हा त्याने स्वतः मधलं वेगळेपण मान्य करून तसं आयुष्य जगायला सुरुवात केली.