इकोफ्रेंडली मखराच्या ५ सोप्प्या आणि भन्नाट आयडियाज!!
बाप्पाच्या आगमनाला ३ दिवस उरलेत. उद्याचा शनिवार आणि परवा रविवारचा संपूर्ण दिवस मखर आणण्यात आणि सजावटीत जातील. तुमचा पण हाच प्लन असेल तर थोडं थांबा.
मंडळी, यंदाचा गणेशोत्सव इकोफ्रेंडली साजरा करूया. बाप्पा येण्यापुर्वीच थर्माकोलच्या मखराची आयडिया विसर्जित करा. थर्माकोलचे मखर बाजारात सहज उपलब्ध आहेत, पण त्याने पर्यावरणाची हानी होते. आता तुम्ही म्हणाल की थर्माकोलला पर्याय आहे का ? तर नक्कीच आहे. अगदी सहज मिळणारे कागद, पुठ्ठा, वृत्तपत्र वापरून तुम्ही मखर आणि आरास तयार करू शकता. याची दुसरी बाजू अशी, की घरातल्या सगळ्यांनी मिळून मखर बनवायचा उत्साह काही वेगळाच असतो.
तर, आज बोभाटा तुम्हाला इकोफ्रेंडली मखर बनवण्यात मदत करणार आहे. इकोफ्रेंडली मखर बनवण्यासाठी आम्ही ५ व्हिडीओ घेऊन आलो आहोत. हे व्हिडीओ पाहा आणि यंदाच्या गणेशोत्सवात नवीन प्रयोग करा.