काही उदाहरणे बघू या.
१ )१९४८-१९६२-१९६५-१९७१ यासारख्या युध्दातून, अनेक अवर्षण आणि दुष्काळाचे फटके सोसूनही आपला जीडीपी वाढतो आहे. १९७२ साली आपण मदत म्हणून मिळालेल्या पीएल ४८० योजनेचा लाल गहू आणि लाल ज्वारीवर गुजराण केली पण पुढच्या दशकात आपण अन्नक्षेत्रात स्वयंपूर्ण झालो.
२ ) विदेशी चलनासाठी १९९१ नंतर सोने विकून आपल्याला खर्च चालवायला लागला होता पण त्यानंतरच्या काळात अशी वेळ पुन्हा कधीच आली नाही. आताही रिझर्व बँकेकडे पुरेसे परकीय चलनाचा साठा आहे.
३) भारतीय बौध्दीक संपदेचे मूल्य या आकड्यात गृहीत धरलेले नसते.विदेशात असलेल्या भारतीय नागरीकांच्या माध्यमातून म्हणजे १९७० नंतर मध्यपूर्व आणि त्यानंतर अमेरीका युरोप कॅनडा येथे स्थायिक असलेल्या भारतीयांमुळे अनेक राज्यांचा आर्थिक स्तर उंचावल आहे. पंजाब, महाराष्ट्र, केरळ , गोवा, आंध्र प्रदेश ही काही ठळक उदाहरणे आहेत. गेल्या दहा वर्षात जगाचा असा एकही कोपरा नाही जेथे भारतीय नागरीक नाहीत.
४) जेव्हा इतर पुढारलेल्या देशात सार्वजनीक वैद्यकीय सेवेचा फजीतवाडा उडला आहे त्याच काळात आपल्या सार्वजनीक वैद्यकीय सेवा व्यवस्थित काम करत आहेत.
५) सगळ्यात शेवटची जमेची बाजू म्हणजे परिवर्तनशिलता आणि सामाजिक शिक्षण- १९८२ साली इतर देशात जेव्हा एड्स पसरत होता तशीच सुरुवात भारतात पण झाली होती. परंतू केवळ सामाजिक शिक्षणातून आपण वेळीच बचावलो. सध्या भारतात एड्सचे रोग्यांची संख्या अत्यंत कमी आहे. थोडक्यात भारतीय नागरीक वेळीच शहाणे होतात.
आपल्या सामूहिक ताकदीचे एक शेवटचे उदाहरण देतो आहे ते असे. इंदीरा गांधी पंतप्रधान असताना १९८३ साली एशियाड स्पर्धा भारतात घेतल्या गेल्या. या स्पर्धांची तयारी बघण्यासाठी आंतरराष्ट्रीय पथक जेव्हा आले तेव्हा कामाचा विकास बघून ते नाराज झाले आणि काम वेळेत पूर्ण होणार नाही असे त्यांना वाटत होते. परंतू भारतीय मनुष्यबळावर भरवसा असलेल्या पंतप्रधानांनी अशी ग्वाही दिली की तुमच्याकडे जे काम यंत्राने होते ते भारतात मनुष्यबळावर होते. त्याची प्रचिती जगाला आपोआपच आली.