दिनविशेष: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती

महाराणी अहिल्यादेवी होळकरांना सारा भारत पुण्यश्लोक म्हणून ओळखतो. पण त्या फक्त पुण्यश्लोकच नाही, तर एक खंद्या शासकही होत्या. 

मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावच्या अहिल्यादेवींचं लग्न वयाच्या आठव्या वर्षीच झालं असं म्हटलं जातं. त्या काळातही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहा-वाचायला शिकवलं होतं.  वयाच्या अवघ्या तिशीतच वैधव्य प्राप्त झालं पण मल्हारराव होळकरांनी सुनेला सती जाऊ दिलं नाही. त्यांनी तेव्हाच माळव्याचा कारभार पाहायला सुरूवात केली आणि मल्हाररावांच्या तालमीत तयार झालेल्या अहिल्यादेवींनी १७६६ ते १७९५ माळव्यावर राज्य केलं. 

स्रोत

त्या स्वत: एक उत्तम लढवय्या होत्या , तसेच त्यांच्या न्यायनिवाड्यासाठीही प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरे आणि नदीघाट बांधले, अनेका देवळांचा जीर्णोद्धार केला, अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, महेश्वर आणि इंदूरचा कायापालट केला. फक्त इतकंच करून त्या थांबल्या नाहीत, तर विधवांच्या हक्कासाठी मोठे निर्णय घेतले. त्याद्वारे विधवांना पतीची मिळकत त्यांच्याकडेच ठेवता आली आणि विधवांना दत्तकविधानाचा अधिकारही मिळाला. अहिल्यादेवींनी कलांना आणि कलाकारांना राजाश्रयही दिला.  त्यांच्या कार्याची यादी खूपच मोठी आहे. 

आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्रस्मृतीस शतश: प्रणाम!!

स्त्रोत

सबस्क्राईब करा

* indicates required